५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

मराठी ब्लॉगिंग मधून मी काय शिकलो?(भाग-१)

मंडळी २५ डिसेंबर २०१० पासुन रोज काहीना काही लिहिण्याचा प्रयत्न करतो आहे,मला ज्या ज्या विषयांची आवड आहे आणि जी माहिती मिळवण्यासाठी मला त्रास झाला आहे तो इतरांना होवू नये हा प्रामाणिक हेतू मनामध्ये ठेवून, जे जे मला माहित आहे ते आपल्या मराठी मित्रमैत्रिणीं सोबत वाटून घेण्याचा माझा प्रयत्न या पुढेही असाच सुरु राहिल.

मंडळी मराठी मध्ये ब्लॉग लिहिताना मला गेल्या काही महिन्यात जे अनुभव आले आणि मी जे काही निरिक्षण केले ते आज तुमच्या सोबत परत याच मंचावर वाटून घेतो आहे.


मराठी ब्लॉगिंग मधून मी काय शिकलो?
                              मी सुरुवात केली तेव्हा नेमके कुठून सुरु करावे याचा विचार करत होतो आणि मग जाणवल आजही मराठी ब्लॉगर्सची संख्या फार कमी आहे...बरेच जण ब्लॉग लिखाणाला सुरुवात करतात आणि काही काळा नंतर त्या गोष्टीला
विसरतात(व्यस्त आयुष्य,नोकरी,व्यवसाय इत्यादी या मागील कारणे असु शकतात.)तसेच नवख्या ब्लॉगर्सना ब्लॉग लिहिताना,सजवताना बर्‍याच अडचणी येतात...मग काही काळाने ते सुद्धा प्रयत्न करायचे सोडतात...
हे लक्षात आल्यावर
 मग एक विषय पक्का मनाशी ठरला आणि मी ब्लॉगिंगचे तंत्र-मंत्र या विषयाने सुरुवात केली...जे जे मी शिकतो आहे ते अगदि सोप्प्या भाषेत चित्रांच्या मदतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला...आणि काही काळातच त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला..त्या बद्दल वाचकांचे मनापासुन आभार...कारण कोड लिहिणे,त्याचे प्रात्यक्षिक करून पाहणे,मग त्याचे स्क्रीनशॉट घेणे, मग त्यावर लिहिणे हे सर्व करताना...खुप काळजी घ्यावी लागते,जवळजवळ १ ते १:३० तास एका लेखासाठी द्यावा लागतो..आणि आपण घेतलेल्या या मेहनीचा इतरांना फायदा होतो आहे हे पाहून फार छान वाटले..भविष्यात मराठी ब्लॉगर्सची संख्या लाखांच्या घरात जावी अशी माझी इच्छा आहे,त्यासाठी मी मदत करायला नेहमीच तयार आहे आणि माझ्या सहब्लॉगर्संना सुद्धा ही विनंती करतो की अधिकाधिक व्यक्तींना मराठी ब्लॉग लिहिण्यास प्रवृत्त करा,मदत करा.

   ब्लॉगिंगचे तंत्र-मंत्राने सुरुवात केल्यानंतर मी इतर विषयांना हात घातला आणि मग त्यात इंटरनेट,संगणक,फेसबुक,नेटवर्क सुरक्षा,उपयुक्त सॉफ्टवेअर,मनोरंजन इत्यादी मला माहित असलेल्या आणि आवड असलेल्या विषयांची भर पडत गेली.सुरुवातीला काही शब्द आणि प्रतिशब्द यावर अडायला व्हायचे मग त्यातुनच मराठी शब्द त्यांचे अर्थ यांचा शोध सुरु झाला आणि मराठी शब्द हा विभाग सुरु केला.मी चारोळ्या लिहितो,कविता करतो,लघुकथा लिहितो,मग त्यासाठी वेगळा ब्लॉग करण्यापेक्षा एक वेगळा विभाग सुरु केला कारण रोजच्या धावपळीच्या आयुष्यात अनेक वेगवेगळ्या विषयांसाठी वेगवेगळे ब्लॉग बनवून त्यात लिखाण करण्यापेक्षा एकाच ब्लॉग वरून वेगवेगळे विषय हाताळणे केव्हाही चांगले,याचा फायदा हा झाला की माझ्या ब्लॉगला एका वेबसाईट सारखे रूप मिळत गेले,ज्यावर विविध विषयांसाठी वेगवेगळे विभाग असतात आणि प्रत्येक जण आपल्या आवडीप्रमाणे त्या त्या विभागाला भेट देवून त्या त्या विषयाची माहिती घेवू शकतो.


ब्लॉगिंग म्हटले की त्यात तुमचे लिखाण चोरून आपल्या ब्लॉग वर प्रकाशित करण्यासारखे प्रकार आलेच...असे अनेक प्रकार सामोरे आले..काही वेळा समजावले काही वेळा कानाडोळा केला...एका प्रकारामध्ये तर एका ब्लॉगरने मी लिहिलेली कविता त्याच्या ब्लॉगवर ठेवली होती...मी त्या बद्दल कळवले तर त्याची प्रतिक्रिया आली," मी ही कविता माझ्या प्रेयसीला मी लिहिली आहे असे सांगितले आहे.कृपया तुम्ही समजुन घ्या मी तिला आता हे सांगू शकत नाही की ही तुमची कविता आहे."  
 :-D मग मी मनात विचार केला ठिक आहे मला नाही झाला तरी कोणाला तरी या कवितेचा फायदा झाला...शेवटी नावात काय आहे? :-)
पण इतर बर्‍याच प्रकारात, नेटवर लिखाणाची चोरी करून, ते आपल्या ब्लॉगवर ठेवून, पैसे कमावण्यासाठी सुद्धा काही महाभाग करतात,त्यांना आवरलेच पाहिजे. मला वाटते गाणी mp3 फॉर्मट मध्ये आपल्या ब्लॉग वरून पुरवणारे ब्लॉगर्ससुद्धा कळतनकळत पायरेसीला हातभार लावत असतात...असो.

असे हळूहळू विषय सुचत गेले आणि त्याप्रमाणे लिखाण होत गेले..जाणून बुजून मी राजकारण,स्त्री-पुरूष संबंध यासारख्या विषयाना ब्लॉगवर समाविष्ट करणे टाळले, हे विषय कितीही गरमागरम चर्चेचे आणि वाचक संख्या खेचणारे असले तरीही.फक्त सामाजिक बांधिलकी मधून तात्कालिन परिस्थिती वर जेव्हा भाष्य करायची संधी मिळाली तेव्हा कळकळीने लिहिले...इतर वेळी या गरमागरम चर्चेचे विषय दुरच ठेवले.बर्‍याच वेळा असे आढळले काही ब्लॉगर्स या माध्यमाचा वापर सामाजिक द्वेष वाढविण्यासाठी करत आहेत.खालच्या पातळीवर जावून केलेली इतिहासातल्या महापुरुषांवर केलेली घाणेरडी टिका मी काही मराठी ब्लॉग्स वर वाचली...आणि मराठी वाचक असेही ब्लॉग चवीने वाचतात याचे दु:ख झाले.

 नुकतेच मी माझ्या ब्लॉग वर मराठी मधून वेबडिजायनिंग शिका,css,php शिका,गणितातल्या युक्त्या असे विभाग सुरु केले आहेत.भविष्यात ही वाटचाल अशीच सुरु राहिली तर १-२ वर्षात मी माझ्या ब्लॉगला मराठी परिपुर्ण वेबसाईट मध्ये बदलायचा प्रयत्न करीन..ज्या साईटचा मराठी कुटूंबातील प्रत्येकाला उपयोग होईल.

हे झाले मला आलेले काही अनुभव आणि मी केलेल्या गोष्टी...लिहिण्यासारखे बरेच आहे..पुढील भागात मी मराठी ब्लॉगिंग करताना उपयोगी पडतील अशी मी केलेली निरिक्षणे लिहिण्याचा प्रयत्न करेन.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर.
गुगलप्लसवर शेअर करा

About प्रशांत दा.रेडकर

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

  Blogger Comment
  Facebook Comment

2 comments:

 1. आभारी आहे सर मि आपल्या ब्लॉगवर दिवसातून एक दोन चक्कर मारतोच !
  आपले लेख खूप माहितीपूर्ण आसतात! ब्लॉगिंग तंत्र मंत्र वाचून त्यावर अंमल
  करायचा विचार करतो आहे आपला ! मराठी ब्लॉगिंग मधून मी काय शिकलो ?
  संपूर्ण मालीका वाचून मग
  प्रयत्न करणार आहे आपण असेच चांगले लेख लिहित रहावे हीच आपेक्षा !
  धन्यवाद !

  ReplyDelete
 2. आताच मी दुसरा भाग लिहिला,प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद :-)

  ReplyDelete