५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

मराठी ब्लॉगिंग मधून मी काय शिकलो?(भाग-२)

मंडळी या भागामध्ये मी माझ्या आता पर्यंतच्या अनुभवावरून आणि निरिक्षणावरून काही निष्कर्ष काढले आहेत त्या बद्दल लिहिणार आहे.नवख्या ब्लॉगर्संना याचा फायदा व्हावा यासाठी हा लेखनप्रपंच. :-)
या आधीचा भाग मराठी ब्लॉगिंग मधून मी काय शिकलो?(भाग-१)
या दुव्यावर वाचता येईल.



१)मंडळी मराठी ब्लॉगर्संना जोडण्याचे महत्त्वाचे काम जर कोणी केले असेल तर http://marathiblogs.net या साईटने.या साईट मुळे माझ्या ब्लॉगला वाचकांपर्यंत जाता आले. त्या बद्दल मी http://marathiblogs.net चे विशेष आभार मानतो.नवख्या ब्लॉगर्संनी आपला ब्लॉग तयार झाल्यावर त्याची नोंदणी या साईटवर करावी आणि त्यांचे ओळखचिन्ह तुमच्या ब्लॉग वर डकवावे..असे केल्याने तुम्ही जे काही तुमच्या ब्लॉगवर लिहाल त्याच्या नोंदी मराठी ब्लॉग विश्वात आपोआप मिळतील.

२)तुमच्या ब्लॉगवर (अनुदिनी लिहिणे जाणूनबुजून टाळले आहे...बहुतेक वाचकाना ब्लॉगला अनुदिनी हा मराठी प्रतिशब्द आहे हे माहित नसते हे मी २-३ वेळा अनुभवले आहे म्हणून) तुम्ही जेव्हा एखादा लेख लिहिता तेव्हा एखाद्या इंग्रजी शब्दाचा मराठी प्रतिशब्द वापरता,पण तांत्रिक विषयावरील  लिखाण करताना. उदा. कोडिंग इत्यादी. मध्ये जर तुम्ही मराठी प्रतिशब्द वापरलात तर समोरच्याचा गोंधळ उडतो..जर प्रतिशब्द वापरायचाच असेल तर इंग्रजी शब्द आणि कंसामध्ये मराठी प्रतिशब्द अथवा या उलट केले तर ते समोरच्याला सहज कळते आणि त्याना त्या शब्दाला मराठी प्रतिशब्द काय आहे याची माहिती सुद्धा मिळते.

३)तुमचा ब्लॉग हा गुगल सर्च मध्ये एखाद्या विषयासाठी शोधला जातो त्या वेळी टाईप करणारी व्यक्ती इंग्रजीचा वापर करते आणि तुम्ही ब्लॉग तर युनिकोड मध्ये लिहिलेला असतो..मग त्या विषयासाठी माहिती शोधताना तो सर्च मध्ये मिळणार कसा? याचे उत्तर आहे मेटा टॅगचा प्रभावी वापर..तो कसा करायचा याची माहिती ब्लॉगिंगचे तंत्र-मंत्र मध्ये दिलेली आहे.

४)ब्लॉगवर लेख लिहिताना अथवा त्याची लेबल तयार करताना इंग्रजी शब्दांचा मध्ये वापर केला तर सर्च इंजिनना तुमचा त्या विषयावरील ब्लॉग शोधण्यास मदत मिळते.

५)अजुनही बरेचसे मराठी ब्लॉगर मराठी सिनेमा,म्हणी,गाणी,विनोद,पाककला या विषयावर लिखाण करताना दिसतात..आणि माझ्या अनुभवा नुसार तुम्ही जेव्हा मराठी विनोद इत्यादी विषयावर लिहिता तेव्हा तुमची त्या दिवशीची वाचकसंख्या वाढलेली असते...आता ह्याला मराठी वाचकांची मानसिकता मानावे की त्यांच्या समोर दुसरे पर्यांय निर्मांण करण्यात आलेले ब्लॉगर्सचे अपयश.  
  पण वाचकांनी दिलेला प्रतिसाद पाहता मी म्हणेन की जर वेगळ्या विषयावर लिहिले गेले आणि लिखाणात विविधता असेल तर नक्कीच ते भरभरून प्रतिसाद देतात.नवख्या ब्लॉगर्सनी ब्लॉगिंग साठी नविन विषय निवडताना थोडी कल्पकता दाखविली तर असे बरेच विषय आहेत जे वाचक उचलून धरतील.

६)मला या विश्वात असेही आढळले की बरेच जण राजकारण,हा पक्ष, तो पक्ष,स्त्री-पुरुष अनैतिक संबंध या विषयावर लिखाण करतात,काहींची मजल तर ऎंतिहासिक व्यक्ती,महापुरुष यांच्या अब्रुची लक्तरे काढ्ण्यापर्यंत गेली आहे.हे पाहून मग कधी कधी दु:ख होते.ब्लॉगिंगचा वापर सामाजिक स्वास्थ वाढविण्यासाठी केला गेला नविन गोष्टी शिकवण्यासाठी केला गेला तर त्यातून समाजाची प्रगती होईल.ते जास्त योग्य असेल अस मला तरी वाटते.हे सर्व गरमागरम विषय आहेत..अधिक वाचक खेचून आणतील...पण याचा समाजाला,देशाला नेमका फायदा काय?याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे.देशाचा,समाजाचा फायदा होत असेल तर मात्र कोणत्याही सामाजिक प्रश्नावर लिहायला घाबरू नका.

७)तुमचे लिखाण नेहमी नाविन्यपुर्ण ठेवा...कुठून तरी उचलेल्या चारोळ्या,कोणाच्या तरी निनावी कविता असे पोस्ट करून वाचक संख्या वाढते पण गुगलला सर्व कळते आणि असे करणे म्हणजे तुमच्या ब्लॉगचे सर्च इंजिन मधील स्थान धोक्यात आणणे..हे कायम ठेवा.

आजसाठी इथेच थांबतो आहे,पुढील भागात गुगल पेज रॅंक बद्दलचे अनुभव सांगेन.

धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
गुगलप्लसवर शेअर करा

About प्रशांत दा.रेडकर

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment