५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

गुगल पेज रॅंक कशी मिळवाल?कशी घालवाल?

मंडळी आज मी गुगल पेज रॅंक कशी मिळवाल?कशी घालवाल?
हे माझ्या वैयक्तीक अनुभवावरून लिहिणार आहे..नक्कीच नवख्या ब्लॉगर्संना याचा भविष्यात फायदा होईल.
तुमच्या ब्लॉगची Google Pagerank कशी पाहायची हे तुम्हाला
तुमच्या ब्लॉगवर Google Pagerank Checker कसा समाविष्ट कराल?

या लेखामध्ये वाचता येईल.



१)गुगल पेज रॅंक कशी मिळवाल?

मित्रानो गुगल पेज रॅंक ही तुमचा ब्लॉग-अथवा साईट सर्च इंजीन मध्ये किती वेळा सापडते आणि त्या  ब्लॉगचा/साईटचा दुवा दुसर्‍या किती ब्लॉग अथवा साईट मध्ये सापडतो या वरून ठरते.गुगल पेज रॅंक मिळवण्याचा सोप्पा मार्ग म्हणजे दिवसातून २-३ वेळा काहीना काही नविन लिखाण करून ते पोस्ट करणे...हे लिखाण याआधी कुठल्याही साईटवर नसावे(थोडक्यात चोरलेले किंवा कॉपी-पेस्ट नसावे.)असे केल्याने तुमच्या ब्लॉग वरची पाने सर्च इंजीन वर नोंदविली जातील..हे रोजच्या रोज होत असल्यामुळे तुमचा ब्लॉग/साईट त्या त्या विषयाच्या लिखाणासाठी...तो विषय शोधताना आपोआप सर्च इंजीनच्या शोधात वरच्या क्रमांकावर राहतील....दर्जेदार लिखाण हेच पेज रॅंक मिळवण्याचे उत्तम साधन आहे..त्यावरच जास्त लक्ष द्यावे..हा मार्ग कठिण असला तरी जास्त प्रामाणिक आहे.

*सतत तुमच्या लिखाणात विविधता आणा..एकाच विषयावर लिखाण करत राहिलात तर तुमचा ब्लॉग/साईट ही ठराविक समुहा पुरतीच मर्यांदित राहिल...जर लिखाणाचा दर्जा सुधारला आणि विषयां मध्ये विविधता आली तरच वाचक वर्गांची संख्या वाढेल.

*दुसरी पद्धत बहुतेक ब्लॉगर्स कडून वापरली जाते ती म्हणजे दुसर्‍या ब्लॉगचे ओळखचिन्ह आपल्या ब्लॉगवर डकवणे..असे केल्याने एका ब्लॉगचे वाचक त्या ओळखचिन्हावर टिचकी देवून दुसर्‍या ब्लॉगवर खेचले जातात..काही ब्लॉगर्स आपला गृप बनवून अशी एकमेकांच्या ब्लॉगची ओळखचिन्ह एकमेकांच्या ब्लॉगवर डकवतात असे केल्याने आपोआप त्यांच्या ब्लॉगचा दुसर्‍या ब्लॉग सोबत अथबा साईट सोबत जोडला जातो...सर्च इंजीन मध्ये सापडतो,वाचक खेचून आणतो...पण बहुतेक वेळा गृप बनवून केल्या जाणार्‍या या प्रकारामुळे नको ते ब्लॉग अथवा साईट सुद्धा वाचकांच्या नजरेत येतात,सर्च  इंजीन मध्ये सापडतात..म्हणून माझी तर सर्व सहब्लॉगर्संना विनंती आहे की ओळखीचा आहे म्हणून त्याच्या ब्लॉगची/साईटची जाहिरात करण्यापेक्षा खरच दर्जा असेल तर त्या ब्लॉगला/साईटला प्रसिद्धी द्या.डकवाडकवी पध्दतीमुळे ब्लॉगचा दर्जा ठरत नाही...मी तुझे ओळखचिन्ह डकवतो तू माझे डकव याला काही अर्थ नाही.

२)गुगल पेज रॅंक कशी घालवाल?

 मंडळी २४-२५ डिसेंबर २०१० पासुन मी रोज निदान २-३ लेख लिहायचे ठरवले होते आणि दर्जा कायम राखण्याचा आणि सतत नवनविन लिखाण करण्याचा मी निर्णय घेतला होता त्या प्रमाणे मी मे महिन्या पर्यंत वेळात वेळ काढून ब्लॉगवर लिहित होतो.त्याचा परिणाम असा झाला की वाचकां कडून प्रतिसाद मिळत गेला आणि माझी गुगल पेज रॅंक सुद्धा आपोआप सुधारली...त्या नंतरच्या १ महिन्याच्या कालावधीत लिखाणाचे प्रमाण रोज एक पोस्ट अथवा १ दिवस आड करून एक पोस्ट असे झाले...त्याचे कारण म्हणजे मी मराठी सोशल नेटवर्किंग साईटच्या कामात थोडा व्यस्त झालो...याच काळात माझ्या एका ब्लॉगच्या एका वाचकांनी जे स्वत: सुद्धा एक ब्लॉगर आहेत त्यांनी मला ही बातमी दिली की माझ्या ब्लॉगची गुगल पेज-रॅंक ३ झाली आहे...अल्पकाळात इतकी रॅंक मिळाल्याने बातमी खरच आनंद देणारी होती...कामात व्यस्त असल्यामुळे पोस्ट करण्याचे प्रमाण ४ दिवसानी एक पोस्ट असे झाले असे फक्त १ महिना सुरु होते...या काळात ब्लॉगर ने आपले रुप बदलले आणि त्यामुळे ब्लॉगिंगचे तंत्र-मंत्र मध्ये मी ज्या ६०-६२ च्या आसपास पोस्ट लिहिल्या होत्या त्या अपडेट करणे भाग होते...नेमकी तिच चुक मी केली आणि एकाच दिवशी मोकळ्या वेळात सर्व पोस्ट मी अपडेट केल्या..आणि नेमका त्याचा फटका माझ्या गुगल पेज रॅंकला बसला...आधीचे सर्व बज आणि ६२ पोस्टचे रेकॉर्ड सर्च इंजीन मधून डिलीट झाल्याने माझी गुगल पेज रॅंक दोन दिवसात ३ वरून १ वर घसरली... :-/

   त्यामुळे मंडळी कधीही भविष्यात तुम्हाला तुमच्या ब्लॉगवरचे पोस्ट अपडेट करायचे असतील अथवा काढून दुसरे टाकायचे असतील , तर एका दिवशी ३ ते ४ पोस्ट बदला...एका वेळी जर जास्त पोस्ट बदलायचा अथवा अपडेट करायचा प्रयत्न झाला तर त्याचा तुमच्या गुगल पेज रॅंक वर भरपुर परिणाम होतो..कारण मी स्वत: अनुभवले आहे..त्यामुळे एकाच वेळी इतके बदल करणे टाळा.

या नंतर मी परत एकदा दिवसाला २-३  पोस्ट लिहायला सुरुवात केली...मी या आधी जे ६०-६२ पोस्ट बदलले होते ते हळूहळू गुगल सर्च मध्ये यायला लागले आणि १ आठवड्याच्या कालावधी नंतर माझी पेज रॅंक परत २ वर पोहोचली..परत तिला ३ वर जायला २-३ महिन्याचा कालावधी लागू शकतो.


हे झाले माझे स्वत:चे अनुभव..नवख्या ब्लॉगर्संना याचा भविष्य़ात नक्कीच उपयोग होईल...माझ्या कडून त्यांना खुप सार्‍या शुभेच्छा!मदत लागली तर मी आहेच. :-)

धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
गुगलप्लसवर शेअर करा

About प्रशांत दा.रेडकर

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

    Blogger Comment
    Facebook Comment

1 comments: