५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

तुम्हाला आलेला स्पॅम मेल(spam email) कुठून आला ते कसे शोधाल?

 मंडळी बर्‍याच वेळा तुम्हाला लॉटरीचे बक्षिस लागले,ते मिळवण्यासाठी अमुक अमुक इपत्त्यावर मेल करा अथवा तुमचे जीमेल खाते हॅक झाले अथवा तुमचे बँक खात्याची ऑनलाईन नोंदणी करायची आहे,सर्व माहिती फॉर्म मध्ये भरून खालील दुव्यावर पाठवून द्या...असे मेल येत असतात...हे सर्व स्पॅम मेल या प्रकारात मोडतात आणि हे सर्व प्रकार तुमची माहिती चोरण्यासाठी केलेले असतात...प्रसंगी यामुळे तुमचे आर्थिक नुकसान होवू शकते अथवा त्याहूनही भयानक प्रकार घडू शकतो.हे प्रकार कसे घडतात याचे प्रात्यक्षिक आणि माहिती हवी असेल तर "तुमच्या इपत्त्यावरून दुसर्‍याना इमेल कसे पाठवले जातात?"
या लेखात तुम्हाला त्याची माहिती मिळेल.

आज आपण असे मेल येतात कुठून ते कसे शोधायचे याची माहिती घेणार आहोत.

हे कसे शोधाल?१)आज जीमेल खात्यावरून(सध्या सर्वांत जास्त वापरात असलेले इमेल सेवा) त्याचा शोध कसा घ्यायचा याची माहिती करण्यासाठी प्रथम तुमच्या जीमेल खात्यावर लॉग-इन व्हा.

२)तुम्हाला जो फसवा (स्पॅम)मेल आला आहे..तो उघडा आणि Reply  च्या बाजुला असलेल्या डॉप-डाउन ऍरोवर टिचकी देवून दिसणार्‍या विविध पर्यांया पैकी Show Original वर टिचकी द्या.


३)आता उघडलेल्या पानावरील संपुर्ण Header कॉपी करा(मॅसेज सोडून वरचा भाग) मग खाली दिलेल्या दुव्यावर जा.

email-tracking 

४)त्या पानावर तळाला तुम्हाला Email Lookup - Free Email Tracker असा चित्रामध्ये दाखविल्याप्रमाणे एक पर्यांय दिसेल.


५)मगाशी तुम्ही जे इमेल Header कॉपी केले होते ते त्यातील
Email Header Analyzer :
(Copy and paste Email header into our free Email tracking tool and start with tracing Email)
च्या खाली दिसणार्‍या रिकाम्या जागेत पेस्ट करा.


६)मग Captcha कोड इंटर करून Track Email पर्यांयावर टिचकी द्या.

७)असे केल्यावर त्याच पानावर तळाला तुम्हाला त्या इमेलचा आयपी ऍडरेस...देश,ठिकाण यांची माहिती मिळेलच आणि त्यांचे नेमके स्थान सुद्धा गुगल नकाशा मध्ये दाखविले जाईल.

८)वरील पद्धतीचा वापर करून तुम्ही स्पॅम मेल  पाठवणार्‍याचे नेमके स्थान शोधू शकता.

धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
गुगलप्लसवर शेअर करा

About प्रशांत दा.रेडकर

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

  Blogger Comment
  Facebook Comment

2 comments:

 1. खुपच उदबोधक माहिती सांगितली. माहिती शेअर केल्याबद्दल आपले मनापासून आभार.

  ReplyDelete
 2. ॒अनामिक
  प्रतिक्रिया दिल्या बद्दल धन्यवाद :-)

  ReplyDelete