५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

तुमचे स्वत:चे ऑनलाईन खरेदी-विक्रीचे दुकान कसे सुरु कराल?

मंडळी आज आपण तुमचे स्वत:चे ऑनलाईन खरेदी-विक्रीचे दुकान कसे सुरु करायचे याची माहिती करून घेणार आहोत.

त्यासाठी तुम्हाला वेबडिजायनिंगची थोडी माहिती असणे आवश्यक आहे.

हे कसे कराल?
साहित्य:
१ डोमेन नेम, आणि वेब होस्टिंग
सध्या .in डोमेन ९९ रुपयाला सहज उपलब्ध आहेत..पहिल्या वर्षासाठी इतका खर्च तुम्ही सहज करू शकता.
 वेब होस्टिंगसाठी मोफत वेब होस्टिंगचा वापर करा अथवा कमीत कमी ५९ रुपया पासुन वेब होस्टिंग सेवा सहज उपलब्ध आहे. 



मोफत वेब होस्टिंग तुमच्या वेबसाईट अथवा ब्लॉगसाठी कशी मिळवाल?
या लेखात तुम्हाला अधिक माहिती मिळेल.

कृती:
१)प्रथम खाली दिलेल्या दुव्यावरून एक स्क्रिप्ट डाउनलोड करा

ऑनलाईन खरेदी-विक्रीचे दुकान




२)तुमच्या वेब-होस्टिंग खात्यावर ती अपलोड करून अनझीप करा..(हे नाही कळले तर जाणकार व्यक्तींची मदत घ्या)

३)आता तुम्हाला एक डेटाबेस लागेल..तो तयार करून घ्या.कसे ते तुम्हाला

तुमचा Wordpress Blog घरच्या संगणकावर कसा सुरु कराल? (भाग-१)

तुमचा Wordpress Blog घरच्या संगणकावर कसा सुरु कराल? (भाग-२)

वाचले असेल तर कळेल.

४)एकदा का डेटाबेस तयार झाला की तुमच्या ब्राऊजर मध्ये
http://yourdomain.com/install.php टाईप करा.

yourdomain च्या जागी तुमच्या डोमेनचे नाव असा बदल करायला विसरू नका.

५)असे केल्यावर चित्रामध्ये दाखविल्याप्रमाणे पान उघडेल त्यात सर्व माहिती भरा आणि install वर टिचकी द्या.


६)आता Installation successful! असा संदेश दिसेल त्या खालील Proceed to my shopping cart ...य़ा दुव्यावर टिचकी द्या.


७)install.php डिलीट करायला विसरू नका..आता तुमचे ऑनलाईन खरेदी-विक्रीसाठीचे दुकान तयार झाले.
ते चित्रामध्ये दाखविल्याप्रमाणे दिसेल.


८)याचे व्यवस्थापन करण्यासाठी
http://yourdomain.com/admin.php दुव्याचा वापर करा.
yourdomain च्या जागी तुमच्या डोमेनचे नाव असा बदल करायला विसरू नका.

९)आता जे पान उघडेल ते खालील प्रमाणे दिसेल...त्यावर तुमचे युजरनेम आणि पासवर्ड टाका.


१०)आता लॉग-इन केल्यावर तुम्हाला खाली दाखविल्याप्रमाणे दिसेल..


त्यातील Configuration पर्यांयाचा वापर करा..आणि हवे ते योग्य बदल करा.


करून बघा सोप्पे आहे...गुगल ऍडसनच्या जाहिराती ठेवून आणि ऑनलाईन वस्तूंची पुस्तकांची विक्री करून तुम्ही यातून पैसे कमावू शकता.

धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा.रेडकर
गुगलप्लसवर शेअर करा

About प्रशांत दा.रेडकर

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

    Blogger Comment
    Facebook Comment

9 comments:

  1. अत्यंत उपयुक्त अशी माहिती आपण दिली त्याबद्दल आपले अभिनंदन, स्वत:चे ऑनलाईन खरेदी-विक्रीचे दुकान कसे सुरु करायचे याची माहिती ज्या सोप्या पध्द्तीने आपण दिली, ती उल्लेखनीय आहे. त्याचा छोटया प्रमाणावर किंवा घरगुती व्यवसाय करणारे, छोटे व्यावसायीक यांना उपयोग होवु शकतो पण त्याच्या सुरक्षितते बाबत प्रश्न उभा राह्तो. हे कितपत सुरक्षीत आहे? हो आणि हे सुरक्षित असल्यास, परत आपल्याकडुन अधिक माहितीची मिळण्याची अपेक्षा वाढत जाते. की समजा स्वत:चे ऑनलाईन खरेदी-विक्रीचे दुकान सुरू केले तर त्यावरिल व्यवहार कशा पध्द्तीने करावे, उदा. पेमेंट, मालाची देवाण घेवाण, डिलीव्हरी या विषयावर आपल्याकडुन विस्तृत मार्गदर्शन व्हावे ही विनंती.

    ReplyDelete
  2. मयुरी हे अत्यंत सुरक्षित आहे.
    उदा.
    shop/admin.php मध्ये लॉग-इन केल्यावर
    तुम्हाला जो Administrative Tools नावाचा पर्यांय दिसतो त्यावरील Configuration मध्ये जावून PayPal खात्याची माहिती द्यावी.
    म्हणजे खरेदी करून झाल्यावर लागणारे पैसे ग्राह्काच्या बॅक-खात्यातून त्यावर जमा होतील..आणि एकदा त्याची खात्री झाली की दुकानाचा मालक दिलेल्या पत्यावर मागवलेली वस्तू पाठवू शकेल.
    PayPal कसे तयार करायचे याची माहिती..खाली दिलेल्या दोन दुव्यांवर वाचायला मिळेल.
    १)http://prashantredkarsobat.blogspot.com/2011/01/paypal-account.html

    २)http://prashantredkarsobat.blogspot.com/2011/01/paypal-account-verify.html

    ReplyDelete
  3. Please send me copy of script to my email.
    Sorry but given link is broken

    ReplyDelete
  4. धन्यवाद,लिंक अपडेट केली आहे

    ReplyDelete
  5. Prashant,

    Web hosting khatyaver ti script kashi upload karaychi yachi jara savistar mahiti dya.. me ya kshetrat agdich navin aahe tya mule tumchi madat havi aahe.. uttarachi vaat pahat aahe..

    Shailesh Lanjekar

    ReplyDelete
  6. तुमचा Wordpress Blog घरच्या संगणकावर कसा सुरु कराल? (भाग-१)

    तुमचा Wordpress Blog घरच्या संगणकावर कसा सुरु कराल? (भाग-२)

    हे दोन दुवे मी लेखात दिले आहेत..त्यावरून तुम्हाला थोडी कल्पना येईल...तसेच बाकी कसे करायचे ते मी चित्रांसोबत या लेखात दाखविले आहे..अगदी तसेच करायचे आहे...बाकी अडचण येत असल्यास..वेबडिजायनिंगची थोडी माहिती असलेल्यांची मदत घेतलीत तर..तुमची समस्या सुटेल

    ReplyDelete
  7. prashant ji, khup khup upyukt mahiti dilyabaddal dhanywad pan paypal che account business acount lagel na ? ka individual var suddha karta yeil ?

    ReplyDelete
  8. प्रशांत धन्यवाद.मी जेव्हा डाटाबेस तयार करतो तेव्हा http://damodharmotors.com/install.php मला खालील एरर येतो तरी हा प्रश्न सोडायला मला मदत कराल? Warning: mysql_connect() [function.mysql-connect]: Access denied for user 'wordpress'@'localhost' (using password: YES) in /home/damodha2/public_html/includes/database/mysql.php on line 13

    Warning: mysql_get_server_info() expects parameter 1 to be resource, boolean given in /home/damodha2/public_html/includes/database/mysql.php on line 14

    ReplyDelete
  9. Thank You for this usefull things

    ReplyDelete