५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

अमेरिकेतला स्थानिक फोन नंबर भारतातून कसा मिळवाल?

अमेरिकेतला स्थानिक फोन नंबर भारतातून कसा मिळवाल? याची आज आपण माहिती करून घेणार आहोत..जेणे करून तुमचे अमेरीकेतले नातलग तुम्हाला त्यांच्या स्थानिक फोन अथवा मोबाईल वरून कॉल करू शकतील ते ही आंतरराष्ट्रिय कॉलचे पैसे न देता.

हे कसे कराल?
१)प्रथम खाली दिलेल्या दुव्यावर जा आणि तुमचे खाते बनवा..

https://www.callcentric.com
सर्व आवश्यक बाबींची पुर्तता करा.




२)आता एक पडताळणी संदेश तुमच्या इपत्त्यावर पाठवला जाईल.त्यातील दुव्यावर टिचकी दिल्यावर तुमच्या खात्याची पडताळणी पुर्ण होईल.


३)पुढच्या इमेल मध्ये तुमच्या Web login:
SIP login चा तपशील असेल तो सेव्ह करऊन ठेवा

३)आता खाली दिलेल्या दुव्यावर टिचकी द्या 
http://phone.ipkall.com/
आणि

आवश्यक बाबींची पुर्तता करा.

SIP Username च्या जागी callcentric कडून मिळालेल्या
SIP नंबरची माहिती द्या...Hostname or IP address च्या जागी callcentric.com लिहा.default area code च्या जागी जो आहे तो कोड राहू द्या...युजरनेम आणि पासवर्ड callcentric खात्याचेच असु द्या.

४)आता तुम्हाला जो इमेल येईल त्यात तुमचा अमेरिकेतला लोकल नंबर असेल..ती सर्व माहिती सेव्ह करून ठेवा.
५)आता खाली दिलेल्या दुव्यावर जा. आणि Express Talk  डाऊनलोड करून इनस्टॉल करा.
Express Talk


६)इनस्टॉलेशन सुरु असताना SIP Setup >>> मध्ये Yes, I already have a SIP account ची निवड करून तुमचा SIP नंबर जो तुम्हाला मेल मध्ये मिळाला आहे तो लिहा.

७)ही पायरी पुर्ण झाली की तुम्ही Express Talk  चा वापर करून कोणत्याही अमेरीकन नंबरला वरून कॉल घेवू शकता.

८)मोबाइल वर कॉल घेण्यासाठी SIP VoIP client तुम्हाला तुमच्या मोबाईल वर configure करावा लागेल."SIP phone”
असा शोध तुम्ही iTunes अथवा Android marketplace मध्ये केला तर त्यासाठी लागणारे apps तुम्हाला मिळून जाईल.

धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
गुगलप्लसवर शेअर करा

About प्रशांत दा.रेडकर

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

    Blogger Comment
    Facebook Comment

5 comments:

  1. Its good to see such a nice blog in Marathi. It is loaded with lots of information. Keep it up.

    ReplyDelete
  2. Prashant,

    How to disable left mouse button on my blog on blogger.com????
    Also i want to know can we disable cntrl+A, cntrl+c on blog ??
    plz help.

    ReplyDelete
  3. 1)http://prashantredkarsobat.blogspot.com/2011/04/right-click-disable.html
    2)http://prashantredkarsobat.blogspot.com/2011/04/right-click-disable_12.html
    याचा वापर करावा
    अथवा http://www.scribd.com/ वर अपलोड करून,लिखाण खाजगी करून प्रिंटिंग,डाऊनलोड इत्यादी पर्यांय डिसेबल करावेत. ते लिखाण ब्लॉग पोस्ट मध्ये द्यावे...म्हणजे ctrl+c,ctrl+v ,ctrl+a चा वापर थांबवता येईल

    ReplyDelete
  4. <*script language="javascript">

    function onKeyDown() {
    // current pressed key
    var pressedKey = String.fromCharCode(event.keyCode).toLowerCase();

    if (event.ctrlKey && (pressedKey == "c" ||
    pressedKey == "v")) {
    // disable key press porcessing
    event.returnValue = false;
    }

    } // onKeyDown

    <*/script>
    हा कोड तुमच्या ब्लॉग टेंपलेट मध्ये समाविष्ट केला तर ctrl+c,ctrl+v चा वापर थांबवता येईल..* काढून टाका

    ReplyDelete