५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

तुमच्या संगणकाला DNS changer या विषाणुचा संसर्ग झालेला आहे किंवा नाही हे कसे ओळखाल?


मित्रमैत्रिणींनो DNS changer या विषाणुमुळे जगभरातले संगणक संक्रमित झालेले आहे..भारतामध्ये सुद्धा  २०००० च्या आसपास संगणकाना  विषाणुचा संसर्ग झालेला आहे..तुमचा संगणक या विषाणुमुळे संसर्ग झालेला आहे किंवा नाही हे कसे ओळखावे याची आता आपण माहिती करून घेणार आहोत.

हे कसे ओळखाल?

१)प्रथम http://www.dns-ok.ca/ या दुव्यावर टिचकी द्या.

२)जे पान उघडेल त्यातील तळाला चित्रामध्ये दाखविल्याप्रमाणे Terms and Conditions  दिसतील त्याखाली असलेल्या I Agree पर्यांयावर टिचकी द्या.


३)यानंतर जे पान उघडेल त्यावर जर तुमच्या संगणकाला DNS changer या विषाणुचा संसर्ग झालेला नसेल तर चित्रामध्ये दाखविल्याप्रमाणे हिरव्या रंगाची सुचना दिसेल.

जर तुमच्या संगणकाला DNS changer या विषाणुचा संसर्ग झालेला असेल तर लाल रंगामध्ये तुम्हाला तशी सुचना दिसेल.
तर आताच या दुव्याचा वापर करून तुमच्या संगणकाला DNS changer या विषाणुचा संसर्ग झालेला आहे किंवा नाही हे ओळखा आणि अधिकाधिक मित्रमंडळीना या बद्दल कळवा.
धन्यवाद!
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
गुगलप्लसवर शेअर करा

About प्रशांत दा.रेडकर

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

    Blogger Comment
    Facebook Comment

3 comments:

  1. Tichki dilyavar tumhi dakhavlya pramane paan ughadat nahi.

    ReplyDelete
  2. प्रशांत मित्रा तू या वेबसाईटवर प्रत्येक लिंक नवीन विंडो मध्ये उघडेल अशी व्यवस्था का केली आहेस? आम्हा वाचकांना याचा फार त्रास वाटतो. तरी नवीन विंडो फक्त तुझ्या वेबसाईट बाहेरील लिंकसाठी योग्य वाटते.
    www.sarkarinaukri2020.com
    धन्यवाद.

    ReplyDelete
  3. मी मराठी:
    त्या दिवसानंतर ही साईट बंद झाली आहे.

    सरकारी नोकरी व्यवस्थापक:प्रत्येक दुवा दुसर्‍या विंडो मध्ये उघडू देणे जास्त सोयीचे आहे कारण हल्ली बहुतेक
    सर्व जण टॅब ब्राउजिंगचा वापर करतात.दुवा आहे त्याच विंडो मध्ये उघडू देणे म्हणजे वाचकांचा आपल्या साईटशी असलेला संपर्क तोडण्यासारखे आहे.

    ReplyDelete