- ना.घ.देशपांडे
- यांचे संपूर्ण नाव नागोराव घन:श्याम देशपांडे.
- यांचा जन्म २१ ऑगस्ट १९०९ रोजी झाला.
- शीळ,अभिसार,खुणगाठी हे त्यांचे कवितासंग्रह प्रसिद्ध झालेले आहेत.
- 'अभिसार'ला महाराष्ट्र शासनाचे आणि 'खुणगाठ' या संग्रहाला साहित्य अकादामीचे पारितोषिक मिळालेले आहे.
- गदिमा पुरस्कार, अनंत काणेकर पुरस्कार, विदर्भ साहित्य संघातर्फे देण्यात आलेली साहित्य वाचस्पती ही उपाधी, इत्यादी पुरस्कारांनी व मानसन्मानांनी त्यांची साहित्यिक कारकीर्द गौरवण्यात आली.
- रानारानात गेली बाई शीळ या गीताने ते जुन्या पिढीमध्ये अत्यंत लोकप्रिय झाले होते.
- प्रणय विभोर गीतरचना,निसर्गचित्रांच्या माध्यमातून शृंगारभावांचे सुचन नायक-नायिकांच्या मनोभावाचे धीट आविष्करण,ही त्यांच्या कवितांची वैशिष्ट्ये आहेत.
- २००० साली त्यांचा मृत्यु झाला.
- Blogger Comment
- Facebook Comment
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
0 comments:
Post a Comment