५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

तुमच्या ब्लॉग अथवा वेबसाइटचा स्वत:चा ब्राउजर टूलबार कसा तयार करायचा?

या आधी आपण ब्लॉगिगचे तंत्रमंत्र विभागात तुमच्या ब्लॉग अथवा वेबसाइटवर  प्रस्थापित  होईल अश्या  टूलबारची माहिती करून घेतली होती. तो दुवा खाली दिलेला आहे
तुमच्या ब्लॉगवर wibiya toolbar कसा समाविष्ट कराल?

आज आपण तुमच्या ब्लॉग अथवा वेबसाइटचा स्वत:चा टूलबार जो तुमच्या वाचकांना त्यांच्या संगणकाच्या  ब्राउजरमध्ये प्रस्थापित करणे शक्य होईल, असा टूलबार कसा तयार करायचा याची माहिती करून घेणार आहोत.

हे कसे कराल?


१)प्रथम खाली दिलेल्या दुव्यावर जा
http://www.conduit.com/

२)जे पान उघडेल त्यावरील Join या पर्यायावर टिचकी द्या.

३)चित्रामध्ये दाखविल्याप्रमाणे सर्व आवश्यक बाबींची पूर्तता करा.



४)यानंतर तुम्हाला चित्रांमध्ये दाखविल्या प्रमाणे एक पडताळणी मेल पाठवला जाईल
त्यातील दुव्यावर टिचकी देवून पडताळणी पूर्ण करा.


५)पुढील पानावरील Start Working पर्याय निवडून चित्रामध्ये दाखविलेले आवश्यक बदल करा.


६)उपलब्ध असलेल्या विविध पर्याया मधून तुम्हाला आवश्यक असलेले पर्याय निवडा.


७)मग केलेले बदल Publish Changes या बटनाचा वापर करून प्रसिद्ध करा.


८)यानंतर distribution tools पर्यायामध्ये जावून तुमच्या  टूलबारचा डाउनलोड करण्यासाठीचा दुवा कॉपी करून घ्या.


माझ्या अनुदिनीसाठीचा दुवा हा खाली दिलेला आहे

http://PrashantRedkarSobat.OurToolbar.com

तिथे जावून टूलबारचा डाउनलोड  केल्यावर तो वाचकांना त्यांच्या  संगणकावरील ब्राउजर मध्ये प्रस्थापित करता येईल.

तो चित्रामध्ये दाखविल्या प्रमाणे दिसेल.


करून बघा..नाही जमले तर मी मदत करीनच :-)

धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर

गुगलप्लसवर शेअर करा

About प्रशांत दा.रेडकर

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment