आज लिहायला बसलोच आहे तर काही दिवसापूर्वी घडलेली एक घटना परत आठवली..ती तुमच्या पर्यंत कळवायची होती,वेळे अभावी ती फेसबुक नोट्स मध्ये लिहून ठेवली होती आज इथे लिहितो.
ती घटना अशी होती.
>>>>>>>>>
कालपासुन थोडी तब्येत ठिक नव्हती...बरीच टाळाटाळ केल्यावर शेवटी आज डॉक्टरकडे जावच लागल :-/..रात्रीचे ११ वाजून गेलेले(घाबरण्याचे कारण नाही...मी नेहमी कमी गर्दीचा मुहुर्त साधून जातो म्हणून उशीरा गेलो.)..अंदाज एकदम बरोबर निघाला आणि कोणीच नसल्यामुळे वेळ वाचल्याचा आनंद झाला.
डॉक्टरकडून निघालो,बाजुच्या मेडिकलमधून औषध घेतली,जरा पुढे गेल्यावर एका अंधार्या कोपर्यावर एक आजीबाई एका मुलीसोबत उभ्या असलेल्या दिसल्या,मला पाहताच त्यांनी मला आवाज दिला...म्हणून मी थांबलो. तर त्या आजीबाई काकुळतीला येऊन थोड्या दबक्या आवाजात मला म्हणाल्या,"एक काम होते, मला मदत कराल का?"
मी म्हटले," हो जरूर."
तर त्यांनी स्वत:कडे असलेली एक औषधांची चिठ्ठी मला दाखवली आणि म्हणाल्या,"मला ही गोळी घ्यायची आहे.पण त्यासाठी पैसे नाहीत माझ्याकडे.माझा मुलगा मला बघत नाही.तुम्ही मदत कराल का?(हे सांगताना त्यांच्या सोबत असलेल्या मुलीचा चेहरा बघण्यासारखा झाला होता.)
मी म्हटले,"ठिक आहे,किती हवे आहेत?
त्या म्हणाल्या," ३० रुपये."
यावर मी काही न बोलता माझ्या खिशात हात घातला,३० रुपये काढून त्यांना दिले.
माझी ही कृती बघुन त्यांना काय बोलावे ते सुचेना.
आणि मी फक्त एक स्मित करून तिथून निघालो.
तर या गोष्टीतून तात्पर्य काय निघते?
१)आजही आपल्या अवतीभोवती समाजामध्ये इतकी गरिब माणसे आहेत की त्यांना औषध-उपचारासाठी निव्वळ ३० रुपयाची रक्कम मिळविणे सुद्धा खुप कठिन गोष्ट आहे. :-/
२)तरूण असतानाच आपल्या म्हातारपणाची अशी सोय करून ठेवावी की वृद्धापकाळात आपल्या मुलाबाळांसमोर लाचार होवून हात पसरायची वेळ कोणावर कधीही येवू नये. :-) अगदी शत्रूवरसुद्धा अशी वेळ येवू नये.
३)आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट>> ती म्हणजे>>तुमच्या या मित्र प्रशांतने उद्या स्टॅम्पपेपर वर जरी लिहून दिले की तो यापुढे कोणाला कधीही कसलीही मदत करणार नाही...तर ती एक अफवा असेल,अफवांवर विश्वास ठेवू नका...कारण परवा पासुन तो अशीच अनोळखी लोकांना मदत करताना कायम सापडेल.तो अजिबात सुधारणार नाही. :-)
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
0 comments:
Post a Comment