मंडळी,
आज आपण इंटरनेटचा उपयोग करून तुमच्या मित्राचा अथवा नातलगाचा संगणक तुमच्या घरातून कसा हाताळायचा याची माहिती करून घेणार आहोत.
उदा. तुमचा मित्र गुजरात मध्ये आहे आणि तुम्ही मुंबई मध्ये...तरीही एका प्रोग्रामचा वापर करून तुम्ही तुमच्या मित्राच्या संगणकाची स्क्रीन, तुमच्या संगणकावरून पाहू शकता आणि पुरेशी परवानगी दिली असेल तर तुमच्या संगणकावरूनच त्याच्या संगणकावर बदल करू शकता.
हे कसे कराल?
1)त्या साठी प्रथम तुम्हाला आणि तुमच्या मित्राला एक प्रोग्राम दोघांच्याही संगणकावर प्रस्थापित करावा लागेल.त्याचे नाव आहे "teamviewer"
खाली दिलेल्या दुव्यावर जावून तो प्रथम डाउनलोड करून,संगणकावर प्रस्थापित करा.
http://www.teamviewer.com/hi/index.aspx
चित्र पहा
२)या नंतर दोघांच्या ही संगणकावर तो प्रोग्राम सुरु करा.
३)प्रोग्राम सुरु झाल्यावर तुम्हाला एक आयडी आणि पासवर्ड भेटेल आणि बाजूलाच पार्टनर आयडी नावाची जागा खाली दिसेल.
त्यात तुम्हाला तुमच्या मित्राला जो आयडी त्याच्या संगणकासाठी प्रोग्राम कडून मिळाला आहे तो टाकावा लागेल.
४)तो आयडी टाकल्यावर "कनेक्ट टू पार्टनर" पर्यायावर टिचकी दया.
५)तुमच्या मित्राकडे त्या बाबतची परवानगी मागितली जाईल आणि त्याने ती दिल्यावर त्याच्या संगणकाची स्क्रीन तुम्हाला तुमच्या संगणकाच्या स्क्रीन वर दिसू लागेल.
करून पहा :-)
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर.

0 comments:
Post a Comment