५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

तुमचा संगणक मराठी मधून बोलेल," सुस्वागतम",पण कसे ?

मंडळी,
 संगणक सुरु केल्या वर जर तुमचा संगणकाने मराठी मध्ये बोलून तुमचे स्वागत केले तर तुमचे मित्र नक्कीच चकीत होतील. नाही का? आज आपण हे कसे करायचे याची माहिती करून घेणार आहोत ;-)

हे कसे कराल?



१)प्रथम तुमच्या संगणकावर नोटपॅड नावाचा प्रोग्राम उघडा.
 start>>Accessories>>notepad

२)या नंतर खाली दिलेला कोड,माउसने सिलेक्ट ऑल करून,कॉपी(ctrl+c) करून, पेस्ट(ctrl+v) करा अथवा तो कोड स्वत: लिहा.मजकुरामध्ये तुम्हाला हवा तसा बदल करा.


Dim speaks, speech
speaks="suswaagatam  suswaagatam   prashant redkar  have 
a nice day  aataa   kaam  suru  karuyaa "
Set speech=CreateObject("sapi.spvoice")
speech.Speak speaks



३)ती फाईल welcome.vbs या नावाने जतन करा.

४)जर तुम्ही win xp वापरत असाल तर  ती फाईल  C:\Documents and Settings\All Users\Start Menu\Programs\Startup या ठिकाणी कॉपी करा.

५)जर तुम्ही win7 अथवा vista वापरत असाल तर ती फाईल  C:\Users\ User-Name\AppData\Roaming\Microsoft\Windows\Start Menu\Programs\Startup या ठिकाणी कॉपी करा.
 User-Name च्या जागी तुमच्या संगणकावरील युजरचे नाव असा बदल करायला विसरू नका.

६)आता दर वेळी जेव्हा तुम्ही संगणक सुरु कराल तेव्हा तो तुमचे, त्याच्या आवाजा मध्ये स्वागत करेल.

करून बघायला विसरू नका.

धन्यवाद ,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर 


गुगलप्लसवर शेअर करा

About प्रशांत दा.रेडकर

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment