***रात्र रेंगाळते***
©प्रशांत दा. रेडकर
*************
रात्र रेंगाळते...
स्वप्नांच्या काठावरती.
घडू नये ते घडते आहे...
ज्याची होती नेमकी भीती.
तू कोण???मी कोण???
क्षणभर मी हे विसरते.
तुझ्यावर लिहिते मी चार ओळी,
ते म्हणतात,"मी कविता करते."
तुझ्या आठवणींनी जाग येते.
दिवसाची सुरुवात छान होते.
कविता तुझ्या बोलू लागतात.
तुझ्या शब्दांनी मी काहूरते.
दिवस झरझर सरू लागतो,
कामामुळे थोडाही वेळ नसतो.
तितक्यात तुझा फोन येतो,
अन तुझ्या ओढीने मी आतुरते.
हे असे का होते???
मी तुझ्यावर प्रेम करते.
मुकी मुकी राहून अशी,
मी एकटीच का झुरते???
रात्र रेंगाळते..रात्र रेंगाळते...
पापण्यांची दारे बंद करून.
मी मनोमनी तुला स्मरते.,
अन मग आठवणींच्या गुलमोहरा सोबत,
पुन्हा पुन्हा बहरते..पुन्हा पुन्हा बहरते.
©प्रशांत दा. रेडकर
घडू नये ते घडते आहे...
ज्याची होती नेमकी भीती.
तू कोण???मी कोण???
क्षणभर मी हे विसरते.
तुझ्यावर लिहिते मी चार ओळी,
ते म्हणतात,"मी कविता करते."
तुझ्या आठवणींनी जाग येते.
दिवसाची सुरुवात छान होते.
कविता तुझ्या बोलू लागतात.
तुझ्या शब्दांनी मी काहूरते.
दिवस झरझर सरू लागतो,
कामामुळे थोडाही वेळ नसतो.
तितक्यात तुझा फोन येतो,
अन तुझ्या ओढीने मी आतुरते.
हे असे का होते???
मी तुझ्यावर प्रेम करते.
मुकी मुकी राहून अशी,
मी एकटीच का झुरते???
रात्र रेंगाळते..रात्र रेंगाळते...
पापण्यांची दारे बंद करून.
मी मनोमनी तुला स्मरते.,
अन मग आठवणींच्या गुलमोहरा सोबत,
पुन्हा पुन्हा बहरते..पुन्हा पुन्हा बहरते.
©प्रशांत दा. रेडकर
0 comments:
Post a Comment