****तू कडाडणा-या विजेसारखी.....****
©प्रशांत दा. रेडकर
***************************
तू कडाडणा-या विजेसारखी,
अचानक कोसळणारी.
अग्नीवर्षाव करून पुन्हा,
शांत शांत बसणारी.
मी आकाशातल्या ता-यासारखा,
चमचमणारा काजवा.
कधी अशनी बनून कोसळतो,
तर कधी टिमटिमणारा दिवा.
कधी तू बनून येतेस,
वा-याची मंद झुळूक.
अंग अंग शहारते अन,
उरते नयनी तुझेच रूप.
मी तहानलेल्या चातकासारखा,
तुझी वाट पाहतो रोज.
दिवसा मागुन दिवस सरतात,
तरी संपत नाही शोध.
कधी येतेस तू स्वप्नांमध्ये,
रात्री पुन्हा जाग्या होतात.
भावना परत जिवंत होवून,
तुझ्या सोबत जगू लागतात.
©प्रशांत दा. रेडकर
अचानक कोसळणारी.
अग्नीवर्षाव करून पुन्हा,
शांत शांत बसणारी.
मी आकाशातल्या ता-यासारखा,
चमचमणारा काजवा.
कधी अशनी बनून कोसळतो,
तर कधी टिमटिमणारा दिवा.
कधी तू बनून येतेस,
वा-याची मंद झुळूक.
अंग अंग शहारते अन,
उरते नयनी तुझेच रूप.
मी तहानलेल्या चातकासारखा,
तुझी वाट पाहतो रोज.
दिवसा मागुन दिवस सरतात,
तरी संपत नाही शोध.
कधी येतेस तू स्वप्नांमध्ये,
रात्री पुन्हा जाग्या होतात.
भावना परत जिवंत होवून,
तुझ्या सोबत जगू लागतात.
©प्रशांत दा. रेडकर
0 comments:
Post a Comment