५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

तुम्ही पाठवलेला मेल वाचला गेला की नाही याची पोचपावती कशी मिळवाल?

 तुम्ही पाठवलेला मेल वाचला गेला की नाही याची पोचपावती कशी मिळवाल? याची माहिती आज आपण करून घेणार आहोत.असे केल्याने तुम्ही पाठवलेला मेल त्या व्यक्तीने वाचला की नाही,अथवा न बघताच डिलीट केला..वाचला तर किती वाजता वाचला?त्याचा ब्राउजर कोणता होता?ऑपरेटिंग सिस्टीम कोणती होती?याची माहिती ही तुम्हाला यामुळे कळेल.
हे कसे कराल?
प्रथम खाली दिलेला वेब दुवा वेब ब्राउजर मध्ये उघडा आणि नाव नोंदणी करा.

http://www.getnotify.com/signup/

३)तुमच्या खात्याची पडताळणी करण्यासाठी एक पडताळणी मेल तुमच्या इमेल खात्यावर पाठवला जाईल तो उघडा आणि तुमच्या खात्याची पडताळणी करा. त्यासाठी इमेल मधील दुव्यावर टिचकी द्या अथवा activation code  नवीन उघडलेल्या पानावर लिहा.


अश्याने तुमच्या खात्याची पडताळणी पूर्ण होईल.

४) ज्या व्यक्तीला मेल करायाचा आहे त्यांच्या इमेल पत्त्याच्या नंतर  .getnotify.com  चा समावेश करा.उदा.
[email protected]  हे फक्त तुम्हाला दिसेल.समोरच्या व्यक्तीला .getnotify.com चा समावेश त्याच्या इमेल मध्ये केला आहे हे दिसणार नाही.

५) समोरच्या व्यक्तीने तो मेल उघडून वाचला तर तुमच्या इमेलेच्या इनबॉक्समध्ये त्या संबंधी माहिती देणार मेल येईल.

त्यात तो मेल कधी उघडला तो दिवस,ती वेळ,ब्राउजर,ऑपरेटिंग सिस्टीम इत्यादीची माहिती असेल.


ही सेवा मोफत असल्यामुळे,एका दिवसात फक्त  पाच इमेलची माहिती  तुम्ही ट्रक करू शकता.

धन्यवाद
गुगलप्लसवर शेअर करा

About प्रशांत दा.रेडकर

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment