५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

तुमचे एकच गुगल खाते वापरून एकापेक्षा जास्त युट्युब वाहिन्या(चॅनल्स) कश्या सुरु कराल?


मित्रमंडळी,
आज आपण तुमचे एकच गुगल खाते वापरून एका पेक्षा जास्त  युट्युब वाहिन्या(चॅनल्स) कश्या सुरु कराल?याची माहिती करून घेणार आहोत.

हे कसे कराल?

१)हे करण्यासाठी प्रथम खाली दिलेला वेबपत्ता वेबब्राउजरमध्ये उघडा.

https://www.youtube.com/
२)मग साईन इन वर टिचकी द्या.

३)साईन इन केल्यावर तुमच्या खात्याशी जोडलेल्या युट्युब वाहिनीचे पान उघडेल.

४)आता कोप-यात तुमच्या खात्याचे चित्र दाखवणा-या गोल आकारावर टिचकी देवून आधी अस्तित्वात असलेल्या चॅनलच्या Creator Studio च्या बाजूला असलेल्या Youtube Settings पर्यायावर टिचकी द्या.


५)आता जे पान उघडेल त्यांच्या तळाला Additional features  मध्ये तुम्हाला Create a new channel नावाचा पर्याय दिसेल त्यावर टिचकी द्या.

६)चॅनलचे नाव,विभाग निवडून I agree to the Pages Terms समोरचा चेकबॉक्स चेक करा आणि मग Done वर टिचकी द्या.

७)असे केल्याने तुमचा आणखी एक युट्युब चॅनल तयार होईल आणि आता ह्या दोन्ही चॅनल्सवर  एकच गुगल खाते वापरून तुम्ही प्रवेश करू शकाल,त्याच प्रमाणे विषयाप्रमाणे वेगवेगळे व्हिडीओ त्या त्या चॅनल्सवर पोस्ट करू शकाल.

८)आता चॅनल सेटिंगमध्ये बदल करण्यासाठी Creator Studio पर्यायावर टिचकी दिल्यावर चॅनल पर्याय निवडून  Status and features पर्यायावर टिचकी देवून तुम्ही  तुमच्या युट्युब चॅनलची पडताळणी करू शकता

त्यासाठी verify पर्यायावर टिचकी द्या..आणि तुमचा मोबाईल नंबर वापरून तुमच्या खात्याची पडताळणी करा.


९)या चॅनलवरील व्हिडिओमध्ये गुगलच्या जाहिराती दाखवण्यासाठी आणि १५ मिनिटापेक्षा जास्त वेळाचे व्हिडिओ अपलोड करता यावे यासाठी अथवा लाईव्ह इवेन्टच्या प्रक्षेपणासाठी, Enable वर टिचकी देवून तुमचा मोबाईल नंबर वापरून तुमच्या खात्याची पडताळणी करा.


धन्यवाद.


गुगलप्लसवर शेअर करा

About प्रशांत दा.रेडकर

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment