मित्रमंडळी,
आता जमाना मोबाईलचा आहे.बहुतेक लोक इंटरनेट मोबाईल,tablet,संगणक अश्या सर्व प्रकारावर वापरतात,त्यात मोबाईल वापरकर्त्याचे प्रमाण वाढत चाललेले आहे.त्यामुळे आजकाल वेबसाईट,ब्लॉग तयार करताना मोबाईल वर कश्या प्रकारे दिसतो?याची काळजी घेणे गरजेचे आहे.त्यामुळे ते तयार करताना"तुमची वेबसाईट अथवा ब्लॉग मोबाईलवर कसा दिसतो आहे?हे कसे तपासाव याची माहिती आज आपण करून घेणार आहोत.
हे कसे कराल?
त्यासाठी प्रथम खाली दिलेला वेब दुवा तुमच्या वेबब्राउजर मध्ये उघडा.
http://mobiletest.me/
तुम्हाला ज्या उपकरणावर ती वेबसाईट अथवा ब्लॉग कश्या प्रकारे दिसेल ते पहायचे आहे,ते उपकरण निवडा
पुढच्या पानावर दिसणा-या रिकाम्या चौकोनी जागेत तुमच्या वेबसाईट अथवा ब्लॉगचा पत्ता म्हणजे URL टाईप करा आणि गो वर टिचकी द्या.
असे केल्यावर तुम्हाला तुमचा ब्लॉग अथवा वेबसाईट मोबाईल वर कशी दिसते याचा अंदाज येईल आणि
जर ती मोबाईल वापरासाठी योग्य नसेल टर तुम्ही त्या ब्लॉगच्या टेम्पलेटमध्ये अथवा वेबसाईटच्या कोडींगमध्ये योग्य ते बदल करून पुन्हा तपासून बघू शकता.
याच वेबसाईट ऑप्शन हा पर्याय वापरून तुम्ही तुमची वेबसाईट अथवा ब्लॉग मोबाईल वर सरळ अथवा आडव्या स्वरूपात कशी दिसते ते बघू शकता.
वेबसाईट वर दिसणारा Devices हा पर्याय वापरून तुम्ही वेगवेगळ्या मोबाईल आणि tablet वर ब्लॉग अथवा वेबसाईट कश्या प्रकारे दिसते याची चाचणी घेवू शकता.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
0 comments:
Post a Comment