५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

हजारो दर्जेदार मराठी ईपुस्तके मोफत कशी मिळवाल?

मंडळी,

तुम्हाला मराठी वाचनाची आवड आहे,पण वेळ मिळत  नाही आणि मोबाईल,टॅबलेट,संगणक यावर वाचायचे ठरवले तर मराठी ईपुस्तके मिळत नाहीत आणि जी मिळत आहेत ती विकत घेवून वाचावी लागत आहेत.मग जर मी  तुम्हाला अशी वेबसाईट दिली जी हजारो दर्जेदार मराठी ईपुस्तके मोफत देत आहे,तर?
विश्वास नाही ना बसत? पण शक्य झाले आहे
 ई साहित्य प्रतिष्ठानच्या प्रयत्नातून हे शक्य झाले आहे.इथे पुस्तक वाचण्यासाठी,डाउनलोड करण्यासाठी,कोणत्याही स्वरूपात पैसे घेतले जात नाहीत,ना जाहिरातीचा भडीमार केला जात.
विविध विषयाची मोफत पुस्तके इथे आहेत.मराठी भाषेसाठी हे मोठ योगदानच म्हणावे लागेल.
या सुंदर वेबसाईटच नाव आहे.इसाहीत्य.कॉम
http://www.esahity.com/

नियमित मराठी ई पुस्तके मिळवण्यासाठी ... आपला ई मेल पत्ता या मेल आयडि वर कळवा... [email protected]

उपलब्ध पुस्तकांची संपूर्ण यादी पाहण्यासाठी खाली दिलेली लिंक वापरा.
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/ebook_list_jan_2016.pdf

ई साहित्य प्रतिष्ठानने आता नुकत्याच पाच सिडींची निर्मिती केली.
१) चारशेहून अधिक ई पुस्तकांची CD दोनशे रुपयांत उपलब्ध आहे.
२) मराठ्यांचा इतिहास व दुर्गदर्शन यांची सिडी : मराठमोळा : १५० रुपये
३) संतसाहित्याची सुमारे ६००० पेजेसच्या ग्रंथांची सिडी : संतसाहित्य : २०० रुपये
४) बालसाहित्याच्या सुमारे १०० पुस्तकांची इडी : स्मार्ट मुलांसाठी : १५० रुपये
५) Audio DVD : मूळ ज्ञानेश्वरी आणि भावार्थ ज्ञानेश्वरी : २०० रुपये
पुणे- पिंपरी येथील साहित्य संमेलनात या सिडींची वेक्री केली गेली
आलेले सर्व उत्पन्न २३२८०/- रुपये नाम फ़ाउंडेशनला देण्यात आले.

 वाचकहो,या सर्वागीसुंदर वेबसाईटला भेट द्या आणि मोफत दर्जेदार  ईपुस्तकांचा लाभ गया.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा.रेडकर

गुगलप्लसवर शेअर करा

About प्रशांत दा.रेडकर

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

    Blogger Comment
    Facebook Comment

1 comments:

  1. हा एक चांगला उपक्रम आहे. ज्या मुळे असे वाचक जे मुंबई बाहेर राहतात आणि ज्यांना अशी पुस्तके पाहायला देखील मिळत नाही त्यांच्यासाठी तर खूप मस्त अँप आहे .

    ReplyDelete