५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

युट्यूब व्हिडीओ ऎनिमेटेड.गिफ(.gif)(हलतीडुलती चित्र)मध्ये कशी बदलाल?

मित्रमंडळ,
आज युट्यूब व्हिडीओ क्लिप ऎनिमेटेड.गिफ(.gif)मध्ये कशी बदलावी याची आपण माहिती करून घेणार आहोत.तुम्ही जर सध्या फेसबुक,ट्वीटर पाहिले असेल तर काही  सेकंदाच्या ऎनिमेटेड.गिफ आपले लक्ष सहज वेधून घेतात.ह्या एनिमेटेड.गिफ तयार करण  काही ऑनलाईन वेबसाईटनी सहज आणि सोप्पे केले आहे.
हे कसे कराल?
१)प्रथम खाली  दिलेल्या दुव्यावर टिचकी द्या.
http://freegifmaker.me/youtube-to-gif/

2)जे पान उघडेल ते खालील प्रमाणे दिसेल.

३)आता तुम्हाला जो युट्यूब व्हिडीओ ऎनिमेटेड.गिफमध्ये बदलायचा असेल त्याची लिंक कॉपी करून पेस्ट करा
उदा.आपण मराठी गायिका सावनीच्या युट्यूब व्हिडीओची लिंक वापरू,तुम्ही जर तिचे fan असाल तर तिची युट्यूब वाहिनी जरूर सबस्क्राईब करा.
https://www.youtube.com/watch?v=8lweYSFbcq4

४)यानंतर लोड युट्यूब व्हीडीओ वर टिचकी द्या.
 
५)आता जे पान उघडेल ते खालील प्रमाणे दिसेल:
 

६)इथे व्हिडीओ सुरु झाल्यावर जिथून तुम्हाला ऎनिमेटेड.गिफ बनवायची आहे तो व्हिडीओ मधला टाईम निवडा,
इथे मी १:११ पासून पुढच्या १० सेकंदाची वेळ निवडली आहे म्हणून
Start time:०१:११ असा निवडला आहे आणि Duration दहा सेकंद ठेवले आहे,त्यापेक्षा कामे सेकंद तुम्ही निवडू शकता,पण १० सेकंदाची मर्यादा दिलेली आहे.
७)हे करून झालयावर Preview वर टिचकी द्या.
८)प्रीव्हू जर तुम्हाला आवडला तर create वर टिचकी द्या. अथवा change पर्याय वापरून आवश्यक बदल करा.
९)create पर्याय वापरल्यावर एनिमेटेड.गिफ तयार होईल जी तुम्ही फेसबुक,skype.twitter वर शेअर करू शकता.अथवा SAVE TO DISK पर्याय वापरून तुमच्या संगणकावर सेव्ह करू शकता.नको नसेल तर डिलीट पर्याय सुद्धा दिलेला आहे.
 
उदा:अश्या प्रकारे तयार केलेली आणि फेसबुक वर शेअर करण्यासाठी असलेली ही लिंक
 
आताच तुम्ही युट्यूब व्हिडीओ  पासून ऎनिमेटेड.गिफ(.gif) कशी करायची हे शिकलात.
अजूनही पुढे नवीन नवीन युक्त्या आपण शिकतच राहू.
मी डिजाईन केलेली माझ्या लहान बहिणीची आणि तुमच्या आवडत्या गायिकेची ही वेबसाईट 
पहायला विसरू नका. :-)
https://savaniravindra.com/
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा.रेडकर

गुगलप्लसवर शेअर करा

About प्रशांत दा.रेडकर

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment