५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

सावनी रवींद्र प्रस्तुत:स्वर हृदयांतरीनादब्रम्ह परिवार आयोजित:मास्टर दीनानाथ मंगेशकर संगीत नाट्य महोत्सव:वर्ष २२वे दिनांक:६ जानेवारी २०१७,वेळ:सायंकाळी ६ वाजता,स्थळ:प्रा.रामकृष्ण मोरे सभागृह,चिंचवड!सावनी रवींद्र Savaniee Ravindrra प्रस्तुत:स्वर हृदयांतरी आणि भावगंधर्व पंडित हृदयनाथ मंगेशकर सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा(माझ्या कॅमेरा लेन्स मधून)कार्यक्रम ज्या क्रमाने झाला त्याच क्रमाने मी छायाचित्र पोस्ट केली आहे.जे उपस्थित नव्हते त्या, सर्वाना पाहता यावीत म्हणून या अल्बममध्ये ठेवत आहे.
या कार्यक्रमाची छायाचित्रे पाहण्यासाठी या दुव्याचा वापर करा 
https://www.facebook.com/media/set/?set=a.10154477662164682&type=1&l=de1b27168c 
 अतिशय सुंदर रीतीने साजरा केलेल्या या कार्यक्रमामध्ये मला उपस्थित राहण्याची संधी मिळाली आणि भावगंधर्व पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते माझा सत्कार झाला हे मी माझ भाग्य समजतो.कारण असे क्षण आयुष्यात खूप कमी वेळा येतात.
कार्यक्रम सुरु होण्याआधी पासून मी सभागृहात उपस्थित होतो. डॉ.वंदना काकूंचा साधेपणा माझ्या मनाला विशेष भावला कारण त्या स्वत: जातीने सर्व तयारीत सहभागी तर होत्याच,पण अगदी लगबगीने कोणाची वाट न बघता,स्वत: त्यांनी झाडाची कुंडी स्टेजवर उचलून ठेवलेली मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे.(माणसाची खरी ओळख अश्या छोट्या छोट्या कृतीतूनच होते.मला तरी हे खूप आवडल.)
कार्यक्रमाची सुरुवात साधारण ६:२०च्या दरम्यान झाली.साधारणपणे एका कार्यक्रमात २५ गाणी सादर केली जातात,पण या कार्यक्रमात सावनीने जवळ जवळ ४० गाणी सादर केली.कार्यक्रम ११:४५ पर्यंत सुरु होता.सावनीचे सादरीकरण अतिशय उत्तम दर्जाचे झाले.अनुभवी फलंदाजाच्या उपस्थितीत जशी दुस-या फलंदाजाची ज्याप्रमाणे फलंदाजी बहरते,अगदी तसच तिच सादरीकरण झाल.
दीप्ती भागवत यांच सूत्रसंचालन वादातीत आहे,जितक्या छान त्या दिसतात तितकीच त्यांची शब्द हाताळायची हातोटी सुंदर आहे.भावगंधर्व पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या तोंडून गीता मागचा खरा अर्थ जाणून घ्यायला मिळाला.त्यामुळे काही गाण्यांबद्दल माझ्या मनात असलेल्या शंकांचं निरसन झाल.सर्व वाद्यवृंद,सहगायक यांनी आपापली जवाबदारी अतिशय

चोखपणे पार पाडली.या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे भावगंधर्व पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा.हा देखील मला याची देही याची डोळा पाहता आला.पंडितजीचा स्पष्टवक्तेपणा मनापासून आवडला.
२०१६ मध्ये सावनीच अधिकृत app आणि वेबसाईट सुरु झाली.स्वत:च अधिकृत app असलेली ती पहिली मराठी गायिका ठरली.हे मोफत app अतिशय छोटे
आहे,तुमच्या मोबाईल मधली जास्त जागा घेत नाही.ते तुमच्या android मोबाईलमध्ये install करण्यासाठी,प्रथम तुमच्या मोबाईलमध्ये गुगल प्ले स्टोर उघडा,सर्चमध्ये
"savaniee ravindrra" टाईप करा.आणि हे app तुमच्या मोबाईल वर प्रस्थापित करा.असे केल्याने तुम्हाला सावनीची माहिती मिळेल,गाणी बघता आणि ऐकता येतील.या
व्यतिरिक्त तुम्हाला तिच्या कार्यक्रमाची माहिती,मेसेज मधून ती वेळोवेळी देत राहील.मग तुमच्या मोबाईलमध्ये तुमच्या आवडता गायिकेसाठी थोडी जागा नक्की द्या!
डायरेक्ट डाउनलोड लिंक इथे आहे:
https://play.google.com/store/apps/details?id=com.savani.ravindra

पण, २०१६ वर्ष संपले आहे,२०१७ सुरु झाले आहे,या वर्षीही दोन नवीन प्रयोग होणार आहेत,असे करणारी ती मराठीमध्ये पहिलीच असेल.लागेल ती मदत मी करीनच .पहिल्या प्रयोगाचे प्रात्यक्षिक तयार आहे.फक्त तो जाहीर होण बाकी आहे.app आणि वेबसाईट ही अशीच २०१५मध्ये तयार होती,पण ती तिच्या चाहत्यांपर्यंत पोहोचायला दीड वर्षाचा काळ गेला. आता बघू या नवीन प्रयोगासाठी किती वेळ घेते? काका लक्ष द्या आणि जरा सावनीला सांगा!!

धन्यवाद मित्रमंडळी,
तुमचा,
प्रशांत दा. रेडकर

 धन्यवाद मित्रमंडळी,
 तुमचा,
प्रशांत दा. रेडकर
गुगलप्लसवर शेअर करा

About प्रशांत दा.रेडकर

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment