मित्रमंडळी,
माझ्या बिल्डींगच्या शेजारी एक नाला आहे आणि मी ज्या परिसरात राहतो त्या ठिकाणी घारींचा वावर आहे.मोठ्या संख्येने घारी त्या परिसरात उडत असतात.संध्याकाळी घरी आलेलो असताना सहज खिडकीतून बाजूच्या नाल्यात लक्ष गेल आणि पाहिलं तर एक घार त्यात पडली होती आणि स्वत:चा जीव वाचवण्यासाठी तिची धडपड सुरु होती.माणूस असो वा पक्षी अथवा प्राणी अस कोणाला तडफडून मरु द्यायचे नाही अस खूप आधी पासून मनाशी ठरवले आहे.या इच्छेतून मग त्या घारीचा जीव वाचवायचा निर्णय घेतला.
काय करावे ते काळात नव्हते.मग इंटरनेटवर शोधाशोध करून काही पक्षी मित्र संस्थांचे नंबर मिळवले.पहिला कॉल ज्या संस्थेला केला त्यांच्याकडे त्या दिवशी कोणी मदतीला उपलब्ध नसल्यामुळे त्यांनी मला मुलुंडच्या दुस-या संस्थेचा नंबर दिला,त्याना संपर्क केला असता संध्याकाळ झाल्यामुळे कोणी येणे शक्य होणार नाही असे कळले.उद्या सकाळी काही होवू शकेल असे कळल्यावर मन थोड व्यथित झाले.पण देव तारी त्याला कोण मारी असेच त्या घारीच्या नशिबात लिहिलेले असावे,म्हणून त्या रात्री तिला काही झाले नाही ना परिसरातील भटक्या कुत्र्यांना तिचा ठाव ठिकाणा कळला!
रात्र तशीच बैचेन अवस्थेत गेल्या वर मी सकाळी उठलो आणि आज यायला उशीर होईल असे कामाच्या ठिकाणी कळवले आणि तडक संस्थेला फोन केला.त्यांनी दुपारपर्यंत माणसे आणि रुग्णवाहिका पाठवतो असे कळवले. तोपर्यत शेजारच्या वस्त्तीतल्या माणसानी त्या घारीला हुसकावून लावायचा प्रयत्न केला हे दिसताच,स्वत: जावून त्याना रोखले आणि संस्थेची माणसे येत आहेत,या पक्षाला इजा केलीत तर तुमच्यावर कारवाई होईल असे सांगितले.हि मात्रा चालली आणि त्यांनी पक्षाला त्रास देणे थांबवले.मग काही काल मी तिथेच थांबलो,थोड्या वेळाने संस्थेची माणसे रुग्णवाहिका घेवून आली.घार नाल्याच्या आत चिखलात पडलेली असल्यामुळे तिला काढताना आम्हाला थोडा त्रास झाला.शेवटी प्रत्यन करून संस्थेच्या स्वयंसेवकांच्या मदतीने तिला बाहेर काढण्यात यश आले.
पतंगाच्या मांझ्यामुळे तिचा पंख कापला गेला होता.बाहेर काढल्यावर तिला साफ पाण्याने स्वच्छ केल्यावर रुग्णवाहिकेमध्ये प्रथमोपचार दिल्यावर त्या घारीची रवानगी संस्थेमध्ये करून तिच्यावर पुढील उपचार करण्यात आले.खरच कोणाचाही जीव वाचला की छान वाटते.शेवटी जीव महत्वाचा,मग तो माणूस असो वा पक्षी अथवा प्राणी :)
धन्यवाद!
तुमचा मित्र,
प्रशांत दा.रेडकर
0 comments:
Post a Comment