पुणे भेटीच्या दरम्यान आणखी एका सुंदर ठिकाणाला भेट देता आली,ते म्हणजे लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे राष्ट्रीय युद्ध संग्रहालय!भारतीय लष्करात आता पर्यंत वापरण्यात आलेली विविध शस्त्रात्रे,बंदुका,तोफगोळे,
रणगाडे इत्यादी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील.
आतापर्यत झालेल्या लढाया,त्यासंबधीचा इतिहास,घडलेल्या घटनाची इत्यंभूत माहिती इथे तुम्हाला वाचायला मिळेल.आयएनएस त्रिशूलची प्रतिकृती इथे ठेवलेली आहेच.पण एक खरेखुरे मिग २३ तुम्हाला इथे पाहायला मिळेल.जर तुम्ही पुण्याला भेट देणार असाल तर हे ठिकाण जरूर बघा!
सकाळी ९ ते संध्याकाळी साडेपाच पर्यत ते सर्वांसाठी खुले असते.इथे कोणतेही प्रवेश शुल्क द्यावे लागत नाही.ज्यांना शक्य नाही त्यांच्यासाठी मी माझ्या कॅमेराच्या लेन्समधून तिथली काही छायाचित्र टिपून घेतली आहेत,ती तुम्हाला पाहता यावी म्हणून या ठिकाणी ठेवत आहे.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
नमस्कार,
मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.
1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.
**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.
**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.
कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट
४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे
savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra
धन्यवाद :-)
0 comments:
Post a Comment