पुणे शहरात फिरताना मला तिथले जे ठिकाण अतिशय आवडले ते म्हणजे (पुणे ओकायामा मैत्री उद्यान) अर्थात पु.ल. देशपांडे उद्यान.पुणे ओकायामा मैत्री उद्यान हे त्याचे जुने नाव आहे.
पुण्यातील सिंहगड रोड वर हे उद्यान आहे.याची रचना जपानी पद्धतीने केलेली आहे.प्रचलित सर्व प्रकारच्या उद्यान शैलीत जपानी उद्यानशैली ही सुंदर आणि अति विकसित उद्यान शैली आहे.जपानी उद्याने त्यांच्या अभिरुचीपूर्ण नैसर्गिकता यासाठी जगामध्ये प्रसिद्ध आहेत.
पु.ल. देशपांडे उद्यान एकूण १० एकर परिसरामध्ये विस्तारले आहे. जपान मधील ओकोयामा शहरातील ३०० वर्ष जुन्या कोराक्वेन उद्यानाप्रमाणे हे उद्यान विकसित केले आहे.या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची झाडे,हिरवळ,पाण्याचे तळे,छोटी टेकडी पाहायला मिळते.अजूनही या उद्यानाचा विस्तार करणे सुरु आहे.मुघल उद्यान हा त्यातल्याच विस्ताराचा भाग आहे.वर्षभरात कधीही तुम्ही या ठिकाणी जावू शकता.सकाळी सूर्योदयापासून ते ११ वाजेपर्यंत आणि संध्याकाळी ४:३० ते ८ पर्यंत हे उद्यान सर्वांसाठी खुले असते.इथे तुम्हाला प्रवेश शुल्क ५ रुपये द्यावे लागते.
मी या ठिकाणी माझ्या कॅमेरातून काही छायाचित्रे काढली,ती तुम्हाला पाहता यावी यासाठी या ठिकाणी ठेवत आहे.कधी पुण्याला जाता आले तर या ठिकाणी नक्की भेट द्या.
धन्यवाद!
तुमचा मित्र,
प्रशांत दा.रेडकर
0 comments:
Post a Comment