५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

शेवटची फडफड........





नमस्कार,
मी आज तिसरी लघूकथा लिहिण्याचा
प्रयत्न केला आहे.
नाव आहे "शेवटची फडफड..."
बघा कशी वाटते ते :)
*************************************************************************************
शेवटची फडफड........
******************
©प्रशांत दा. रेडकर.

*************************************************************************************

कुठेतरी पुस्तकात वाचलं की लव्हबर्डची जोडी घरात असेल तर आपल्यावर प्रेम करणारं कोणी तरी आयुष्यात येत..असलेलं प्रेम वाढत.म्हणुन मोठया आवडीने लव्हबर्डची जोडी घरात आणली.एक दिमाखदार पिंजराही घेतला त्यांच्यासाठी..सजलेला सुंदर पिंजरा.

रंगीबेरंगी सुंदर चिमुकले जीव,रंगीत कापसाला चिमुकली चोच,दोन पाय,दोन डोळे लावून बनवलेले शोपीसच जणु.घरी येणारे जाणारे आवर्जुन पाहायचे."किती छान दिसतात",म्हणून कौतुक करायचे.सकाळी सकाळी जाग यायची, ती सुद्धा त्यांच्या चिवचिवाटाने.खुप छान वाटायचे.घरात कोणी नसले तरी चिवचिवाट करुन,घर डोक्यावर घ्यायचे.ते सोबत असले कि घरच जिवंत व्ह्ययचे.त्यांच्यामुळॆ आयुष्यात प्रेम आली की नाही,ते नाही माहीत,पण चैतन्य,जिवंतपणा नक्कीच आला होता.कोणी बोलायला नसले की त्यांच्या सोबत गप्पा मारण्यात वेळ कसा जायचा,ते कळायचे सुद्धा नाही.

दिवस असेच जात होते, लव्हबर्ड आता अगदी आयुष्याचा भाग झाले होते.एक दिवस अचानक मला असं जाणवलं की एका लव्हबर्डच्या हालचाली थोडया मंदावल्या आहेत.माणसांचे एक बरे आहे,काही दुखले खुपले की तोंडाने सांगू तरी शकतात.हे मुके जीव ते कसे सांगणार.शेवटी मीच ठरवलं,त्या लवबर्डला घेवून प्राण्यांच्या डॉक्टर कडे जायचे. मित्राला म्हणालो,"चल माझ्या सोबत,या लव्हबर्डला घेवून डॉक्टर कडे जावू. तर तो म्हणाला,"वेडा आहेस का तू?,७५ रुपयाला दुसरा मिळतो, मेला की दुसरा आण."

मी: अरे भावनाना असे पैशाने कसे तोलतोस??.मी लव्हबर्डना पाळले आहे,तर त्यांची काळजी घेणे हे माझे कर्तव्य आहे.पैशाने दुसरा मिळेल,पण तोच मिळेल का??." या वर तो निरुत्तर झाला.

मग मी त्या लव्हबर्डला डॉक्टर कडे घेवून गेलो.डॉक्टरने सांगितले,"याला एक विषाणूजन्य आजार झाला आहे,हा जास्त वेळ नाही काढू शकणार.तरी ही औषध लिहून देतो,ती वेळेवर डॉपने पाज."

औषधाची चिठ्ठी घेवून केमिस्ट कडे गेलो.तो म्हणाला,"घरात कोणी लहान मुलं आजारी आहे का?."

मी:"नाही,लव्हबर्ड आजारी आहे माझा."

तो :"अहो,पण त्याच्या किंमतीच्या मानाने,ही औषध महाग आहेत.

मी यावर काहीच बोललो नाही.

घरी आलो,डॉपरने त्या लव्हबर्डला औषधाचे थेंब पाजले. माहीत होते मला की तो वाचणार नाही,तरी त्याला जगवायचा माझा प्रयत्न सुरुच होता."रात्री झोपण्याच्या आधी त्यांच्या पिजऱ्याकडे लक्ष गेले,तर तो लव्हबर्ड पिंजऱ्याच्या एका कोपऱ्या मध्ये शांत बसला होता.त्याच्या शरीराची होणारी थरथर दुरुनच जाणवत होती माझ्या डोळयाना.

दिवे बंद केले आणि झोपलो.रात्री एकचा सुमार असेल,विचित्र चिवचिवाट व पंखांच्या फडफडीचा आवाज आला. तसाचं डोळे चोळत उठलो.दिवे लावले,पाहिले तर तो लव्हबर्ड जीवाच्या आकांताने इकडेतिकडे धडपडत होता,फडफडत होता. त्याचा जोडीदार,त्याची ती अवस्था पाहून,आर्त चिवचिवाट करत होता.

मी लगेच पिंजऱ्याचा दरवाजा उघडला आणि त्या लव्हबर्डला अलगद हातामध्ये घेतले. माझ्या तळहातावर सुद्धा त्याची ती असहाय्य धडपड सुरु होती.३-४ क्षणंच झाले असतील फक्त,त्याच्या पंखाची गती मंदावली,पाय वाकडे झाले,त्याने मान टाकली,डोळ्यातून प्राण गेला त्याचा.......त्याचा तो निर्जीव देह,मी तळहातावर तसाच ठेवला होता....डोळ्यातून कधी नव्हे ते पाणी ओघळले माझ्या...कधी ते मला सुद्धा कळले नाही.

त्यानंतर नवीन लव्हबर्ड घ्यायची हिंमत नाही झाली.असे नाही की खिश्या मध्ये ७५ रुपये नव्हते.

पुस्तकात तर लिहिले होते, लव्हबर्डची जोडी घरात आणली की आयुष्यात प्रेम येते,पण इथे तर हा पक्षी आपल्या आयुष्यातून कोणी गेले की काय वाटते,ते शिकवून गेला.
©प्रशांत दा. रेडकर.
*************************************************************************************
गुगलप्लसवर शेअर करा

About प्रशांत दा.रेडकर

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

    Blogger Comment
    Facebook Comment

7 comments:

  1. khup sundar aahe...music sobat vachatana aankhinach havarlya sarkha hotay ya kathe madhe...music chi saath khup chan diliye

    ReplyDelete
  2. सर्वांचे मनापासुन आभार :)

    ReplyDelete
  3. Prashant Apratim aahe..
    kshan bhar Mala ase watale ki te majhech aahet..
    coz m d same person as u hav mentioned in the story..

    ReplyDelete
  4. धन्यवाद मीशब्दसखा,
    हो माझ्या घरी सुद्धा लव्हबर्ड आहेत :)

    ReplyDelete