५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

इंटरनेट वर स्वत:ला कसे सुरक्षित ठेवाल(Online Safety)?

खरतर इंटरनेट हे नविन गोष्टी शिकण्यासाठी आणि नविन ओळखी करून घेण्यासाठी खुप उपयुक्त माध्यम आहे..पण प्रत्येक गोष्टीचे जसे फायदे असतात तसे तोटे ही असतातच.जर तुम्हाला नेट वापरायचे असेल तर ते काळजीपुर्वक वापरणे जास्त हिताचे आहे.योग्य त्या गोष्टींची खबरदारी घेतली तर तुम्ही स्वत:ला इंटरनेट वर सुरक्षित ठेवू शकता.
त्यामुळे ऑनलाईन असताना कायम सावधानता बाळगा.
खालील गोष्टींचा अवलंब करा:



1)तुमची खाजगी माहिती उघड करू नका:
इंटरनेट वर असे अनेक भामटे असतात जे दुसर्‍या लोकांची खाजगी माहिती चोरून त्याचा वाईट वापर करतात...मुख्यत: लहान मुले आणि किशोरवयीन मुले अश्या गोष्टींना बळी पडतात. त्यामुळे कृपया स्वत:ची खाजगी माहिती ब्लॉगवर,सोशलनेटवर्किंग साईट वर,chatroom,instant messenger chat,अथवा इमेल वर उघड करू नका.

॒ chat करताना तुमच्या खर्‍या नावा ऐंवजी नेहमी टोपण नावाचा(screen name) वापर करा.

॒ज्या वेबसाईट वर तुमची खाजगी माहिती सुरक्षित नाही अश्या ठिकाणी तुमचा फोन नंबर,पत्ता,मोबाईल नंबर देवू नका.

॒अनोळखी लोकाना तुमच्या विषयीची अथवा तुमचे कुटूंब,मित्रपरिवार यांच्या बद्दलची खाजगी माहिती देवू नका.

॒जास्त ओळख नसलेल्या लोकाना तुमची छाय़ाचित्र पाठवू नका.

॒तुम्ही इंटरनेट वर संपुर्ण पणे सुरक्षित आहात असे समजू नका,तुम्ही तुमची खाजगी माहिती जरी शेअर केली नाही तरी ही असे अनेक मार्ग आहेत ज्यांमुळे तुमची माहिती शोधणे फारसे कठिण नाही.

२)तुमचा पासवर्ड कोणासोबत शेअर करू नका(तुमचे पालक अथवा जोडीदार सोडून बाकीचे :-) ...)
तुमच्या इमेल अकांउन्टचे,मॅसेंजरचे अथवा सोशल नेटवर्किंग अकांउन्टचे पासवर्ड तुमच्या मित्रांसोबत अथवा दुसर्‍या व्यक्तीं सोबत शेअर करू नका. कारण तुमच्या मित्रांचा इंटरनेटचा वापर नीट नसेल तर तुम्ही विनाकारण गोत्यामध्ये येवू शकता. तुमच्या पालकांसोबत तुम्ही पासवर्ड शेअर करू शकता जर तुम्ही लहान असाल तर.जेणे करून तुमच्या नेट वापरा वर त्यांचे लक्ष राहिल.

३)अनोळखी लोकाना भेटणे टाळा.
तुम्ही एखाद्याची प्रोफाईल वाचली आहे,अथवा फोटो पाहिला आहे याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्यांना पुर्ण ओळखता.बहुतेक वेळा इंटरनेट वर लोक आपली खरी ओळख तर लपवतातच पण त्यांचा खरा हेतू सुद्धा लपवून ठेवतात.बर्‍याच वेळा खोटे बोलतात. कोणी इंटरनेट वर चॅट करताना चांगल्या प्रकारे बोलला तर याचा अर्थ असा नाही की तो खर्‍या जगात तसाच वागेल.बहुतेक वेळा हे धोकादायक ठरू शकते..म्हणून जर तुम्हाला ऑनलाईन व्यक्तींना खर्‍या आयुष्यात भेटायचे असेल तर आधी तुमच्या पालकांना याची कल्पना द्या आणि मगच वेळ ठरवून तुमच्या पालकांसोबतच त्यांची भेट घ्या(विशेषत: लहान आणि किशोरवयीन मुला-मुलींनी)

४)ऑनलाईन वाचलेल्या/पाहिलेल्या प्रत्येक गोष्टीवर लगेच विश्वास ठेवू नका.
ऑनलाईन दिसणारी प्रत्येक गोष्ट खरी असतेच असे नाही,त्यामुळे माहितीचा खरे खोटेपणा तपासल्या शिवाय त्यावर विश्वास ठेवू नका.माणसे त्यांचे वय काय?ते कोण आहेत?ते कसे दिसतात?ते तुम्हाला कसे ओळखतात? ही माहिती अनेक वेळा लपवून ठेवतात.
तसेच बहुतेक वेबसाईट आणि इमेल मधली माहिती ही दिशाभूल करणारी अथवा चुकीची असते.(विशेषत: लहान आणि किशोरवयीन मुला-मुलींनी आपल्या पालकांना विचारून त्या माहितीची शहानीशा करून घेणे गरजेचे आहे.)

५)कोणतेही अनोळखी सॉफ्टवेअर डाऊनलोड करू नका:
   बर्‍याच वेळा अश्या अनोळखी सॉफ्टवेअरचा वापर तुमच्या संगणकातली खाजगी माहिती,पासवर्ड,credit card ची माहिती चोरण्यासाठी होतो,त्यामुळे अशी अनोळखी सॉफ्टवेअर डाऊनलोड करू नका.

६)अनोळखी त्रासदायक मॅसेज अथवा इमेलना रिप्लाय देवू नका:
जर कोणी तुम्हाला त्रासदायक मॅसेज अथवा इमेल पाठवत असेल तर त्यांना रिप्लाय  देवू नका..बर्‍याच वेळा असे मेल,मॅसेज तुमची काय प्रतिक्रिया येते ते जाणण्यासाठी केले जातात.तुम्ही त्याला रिप्लाय दिलात तर त्रास अधिकच वाढत जातो. अश्या वेळी तुमच्या पालकांची अथवा पोलिसांची मदत घ्य़ा.

७)तुम्ही जे पोस्ट करता तश्या प्रकारच्या प्रतिक्रिया तुम्हाला मिळतात.

चुकीची माहिती पोस्ट करू नका,जश्या प्रकारचे मॅसेज तुम्ही पोस्ट कराल तश्या प्रकारचे लोक तुम्हाला प्रतिक्रिया देतील.त्यामुळे आपण काय कश्या विषयी,कोणत्या विषयावर बोलतो आहोत,त्या बद्दल काळजी घ्या.

८)अनोळखी माणसांनी विचारलेल्या खाजगी प्रश्नाना उत्तरं देवू नका.
कोणी अनोळखी माणूस तुमची खाजगी माहिती विचारत असेल,तर असे संभाषण वेळीच थांबवा.

९)कोणत्याही भांडणामध्ये स्वत:ला गूंतवू नका.
बर्‍याच वेळा माणसे खर्‍या आयुष्यात जे बोलत नाहित..ते ऑनलाईन बोलताना बोलून जातात.बरेच लोक तर नको ते पण बोलून जातात.जे अतिशय खालच्या पातळीचे असते,फक्त हे बघण्यासाठी की तुम्ही काय प्रतिक्रिया देता.अश्या लोकांसोबत वाद घालण्यापेक्षा त्यांना ब्लॉक करा अथवा तुमच्या पालकांना सांगा.

१०)प्रौढांसाठी असलेल्या साईट्वर जाणे टाळा.

नेट वर अश्या बर्‍याच साईट असतात ज्या फक्त प्रौढांसाठी असतात.अश्या साईट वर जाण्याचा मोह टाळा.तिथे असलेले साहित्य आणि लोक यांच्या संपर्कात येण्याचे टाळा.तुम्हाला नेटची कितीही माहिती असली तरी अश्या जागी तुम्हाला कश्या प्रसंगाला तोंड द्यावे लागेल ते कोणीही सांगू शकत नाही.
(विशेषत: लहान आणि किशोरवयीन मुला-मुलींनी,त्यांच्या पालकांनी या बाबत योग्य ती काळजी घ्य़ा.)

११)एक गोष्ट कायम लक्षात असू द्या तुम्ही इंटरनेट वर जे काही करता,मग तुम्ही लिहिलेला इमेल असो अथवा तुम्ही टाकलेले एखादे छायाचित्र,अथबा लिहिलेली कोणतीही माहिती ही नेट वर कायमस्वरूपी राहते. तुम्ही जरी ते डिलीट केलेत तरी सर्च इंजीन त्याची एक प्रत सेव्ह करून ठेवतात.त्यामुळे ऑनलाईन काहीही पोस्ट करताना १० वेळा विचार करा.

धन्यवाद.
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
CO.CC:Free Domain
गुगलप्लसवर शेअर करा

About प्रशांत दा.रेडकर

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

    Blogger Comment
    Facebook Comment

2 comments:

  1. Chhaan info aahe!! Pann he sagla mala waat ta Internet var... say... jevha Orkut/Twitter/Gmail var jaato{SIGN UP karto} tevha he companies nako te services cha advertising aaplya account madhe kartaat, tyaacha traas ghenyapeksha asle useful mails vagaire post kelet tar adhikach chaangle hoil!!Naay??

    ReplyDelete
  2. विराज या बाबतीत आपण काही करू शकत नाही,कारण फेसबूक,ऑर्कुट सारख्या कंपन्या तुम्हाला त्यांची सर्विस फुकट वापरायला देतात...त्या मुळे त्यांना उत्पन्न मिळवण्यासाठी ते अश्या जाहिराती वापरतात.

    ReplyDelete