५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

तुमचा ब्लॉग गूगल सर्च मध्ये कसा नोंदवाल?

मित्रांनो बर्‍याच वेळा नविन ब्लॉगरना नविन ब्लॉगर ना आपला ब्लॉग गूगल सर्च मध्ये कसा नोंदवावा हे माहित नसते.आपण ब्लॉग तर तयार केला पण तो गूगल सर्च मध्ये दिसत नाही आता काय करावे ते त्याना कळत नसते.

मित्रांनो आज आपण काही युक्त्या आणि पद्धती जाणून घेणार आहोत,त्याचा वापर केल्याने तुमचा ब्लॉग गूगल सर्च इंजिन मध्ये सर्च केल्यावर दिसू शकतो.१)तुम्ही नुकताच तुमचा ब्लॉग तयार केला आहे,५-६ पोस्ट लिहून झालेल्या आहेत,तो गूगल सर्च मध्ये मिळत नाही आहे,खालील पद्धतीचा वापर केल्यास तो तुम्हाला काही वेळातच गूगल सर्च मध्ये दिसू लागेल.
उदा. माझा ब्लॉग http://prashantredkarsobat.blogspot.com/ गूगल सर्च इंजिन मध्ये
आधीच नोंदवला गेला आहे, तुम्ही मराठी ब्लॉगर असाल,तर माझ्या ब्लॉग वर प्रतिकिया देताना तुम्ही तुमच्या ब्लॉगचा पत्ता त्या प्रतिक्रिये मध्ये देवू शकता, एकदा का तुमची प्रतिक्रिया माझ्या ब्लॉग वर दिसू लागली की तुमच्या ब्लॉगचा पत्ता त्या प्रतिक्रिये सोबत
गूगल सर्च मध्ये दिसू लागेल.म्हणजे केवळ काही मिनिटात तुमचा ब्लॉग गूगल सर्च मध्ये दिसू लागले.
हे तुम्ही कोणत्याही ब्लॉग वर करू शकता जो या आधी गूगल सर्च वर नोंदवला गेला आहे.
फायदे:
*तुमचा ब्लॉग गूगल सर्च मध्ये पटकन नोंदवला जातो.
*नेट वर हजारो ब्लॉग असतात,त्यामुळे भरपूर वाचक संख्या असलेल्या ब्लॉग वर तुम्ही तुमच्या ब्लॉगचा पत्ता दिलात तर आपोआप प्रतिक्रिया वाचताना तुमचा ब्लॉग वाचकांचे लक्ष वेधून घेवो शकतो.

२)खाली दिलेल्या लिंक वर जावून तुम्ही तुमचा ब्लॉग गूगल सर्च इंजीन वर नोंदवू शकता..एकदा नोंदणी केल्यावर तुमचा ब्लॉग ५-६ दिवसात गूगल सर्च मध्ये दिसू लागेल.

त्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर जा,चित्रामध्ये दाखविल्या प्रमाणे सर्व माहिती भरा,मग Add URL वर टिचकी द्या.
http://www.google.com/addurl/३) प्रथम तुमचे गूगल युजरनेम आणि पासवर्ड वापरून गूगल अकाऊन्ट वर Sign in व्हा
त्या साठी या लिंक वर टिचकी द्या https://www.google.com/accounts/Login?hl=en&continue=http://www.google.co.in/

*एकदा का तुम्ही लॉग-इन झालात की.जे पान उघडेल त्यात तुम्हाला My products नावाचा पर्यांय दिसेल,त्यातील Webmaster Tools नावाच्या पर्यांया वर टिचकी द्या.

एक नविन पान उघडेल. त्या वरील Add a Site या पर्यांया वर टिचकी द्या.आणि तुमच्या ब्लॉगचा पत्ता त्या मध्ये लिहा.

*आता खाली दिलेल्या लिस्ट मध्ये तुम्हाला तुमच्या ब्लॉगच्या नावा समोर Verify this site नावाचा पर्यांय दिसेल.

त्यावर टिचकी दिल्या वर तुम्हाला खालील पर्यांय दिसतील.

त्यातील Add a meta tag to your site's home page पर्यांय निवडा.

त्यानंतर Copy the metas tag below, and paste it into your site's home page.असे लिहिलेले दिसेल त्याचा खालीच

असा कोड दिसेल तो कॉपी करून घ्या.

*यानंतर verify वर टिचकी द्या.

*आता तुमच्या blogger.com वर Sign in करून Design>>Edit HTML पर्यांया वर टिचकी द्या.

आता जो कोड आपण या आधी कॉपी केलेला आहे,तो तुमच्या ब्लॉगच्या


च्या मध्ये पेस्ट करा.


हे केल्या नंतर सेव्ह वर टिचकी द्यायला विसरू नका.

असे केल्याने २-३ दिवसात गूगल सर्च इंजीन कडून तुमचा ब्लॉग अधिकृतरित्या नोंदवला जाईल.
महत्त्वाची गोष्ट: तुमचा कोणताही ब्लॉग कायम सर्च इंजीन ला मिळावा यासाठी
Settings>Basicमधील

Add your blog to our listings?
Let search engines find your blog?

या दोन्ही पर्यांयां समोर Yes ची निवड करायला विसरू नका.

Clicksia


तुम्हाला खालील लेख वाचून
तुमचा ब्लॉग ४१ Search Engines वर कसा नोंदवाल? हे कळेल

धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
गुगलप्लसवर शेअर करा

About प्रशांत दा.रेडकर

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment