५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

तुमच्या अनुदिनीचे(Blog चे) फेसबूक वरचे पान कसे तयार कराल?

मंडळी आजच मला माझ्या अनुदिनीचे वाचक विवेक यांनी फेसबूक वर आपल्या ब्लॉगचे पान कसे तयार करायचे याची माहिती विचारली.त्यासाठी आजचा लेख लिहित आहे.

तुमच्या अनुदिनीचे(Blog चे) फेसबूक वरचे पान कसे तयार कराल?


१)प्रथम तुमच्या फेसबूक प्रोफाईल वर लॉग-इन व्हा

२)तुम्हाला आधी तुमचे फेसबूक पान तयार करावे लागेल,त्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर टिचकी द्या.

३)असे केल्याने तुम्हाला खालील पर्यांय दिसू लागतील.

त्यातील योग्य त्या पर्यांयाची निवड करा..

उदा. मी इथे Cause or Community हा शेवटचा पर्यांय निवडला.
त्यानंतर चित्रामध्ये दाखविल्या प्रमाणे Community चे नाव निवडून I agree to Facebook Pages Terms या पर्यांया समोर टिचकी देवून झाल्यावर तुमचे पान तयार होईल.

४)आता त्या पानावर आवश्यक ती माहिती भरा..या नंतर तुमचे फेसबूक पान तुमच्या अनुदिनीवर दाखवता यावे यासाठी  चित्रामध्ये दर्शविल्या प्रमाणे तुमच्या फेसबूक पानावरील पर्यांय क्रमांक ५ ची निवड करा.

५)यातील Add Like Box वर टिचकी द्या.

६)असे केल्याने एक नविन पान उघडेल.
त्यात चित्रामध्ये दाखविल्या प्रमाणे तुमच्या Facebook Page URL चा पत्ता कॉपी करून पेस्ट करा.त्या नंतर Get Code या पर्यांयावर टिचकी द्या.

७)असे केल्यावर तुम्हाला खालील चित्रा प्रमाणे कोड दाखवणारी विंडो उघडलेली दिसेल, त्यातील पहिले iframe कोड नोट्पॅड मध्ये कॉपी करून घ्या.


८)आता ब्लॉगरच्या बदललेल्या नविन स्वरुपानुसार तुमच्या ब्लॉगच्या नावासमोरील घराच्या आकारच्या चिन्हावर टिचकी दिल्यावर जो layout पर्यांय दिसतो त्याच्यावर टिचकी द्या.

९)या नंतर Add a Gadget वर टिचकी द्या.

१०)आता विविध पर्यांयां पैकी HTML/JavaScript  हा पर्यांय निवडा.

११)आता आपण जे iframe कोड नोट्पॅड मध्ये सेव्ह केले होते ते या ठिकाणी पेस्ट करा आणि मग सेव्ह वर टिचकी द्या(चित्र पहा.)


१२)या पायर्‍या तुम्ही नीट पार केल्यात तर तुम्हाला तुमच्या अनुदिनीचे पान तुमच्या ब्लॉगच्या साईडबार मध्ये खालील प्रमाणे दिसू लागेल.

प्रशांत रेडकर सोबत फेसबूक वरचे पान


धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
गुगलप्लसवर शेअर करा

About प्रशांत दा.रेडकर

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

    Blogger Comment
    Facebook Comment

3 comments:

  1. धन्यवाद प्रशांत.
    तुज्या ह्या टीप चा उपयोग झाला.

    ReplyDelete
  2. धन्यवाद :-),मराठी ब्लॉगिंगमध्ये अधिकाधिक सुंदर,दर्जेदार ब्लॉग निर्माण व्हावे यासाठी "ब्लॉगिंगचे तंत्र-मंत्र" विभाग सुरु करण्याचा माझा हेतू होता..तो हळूहळू साध्य होतो आहे..तुमच्या प्रतिक्रियेबद्दल आभार.

    ReplyDelete
  3. सर ५ नंबर चे ऑप्शन नाही ये मी काय करू

    ReplyDelete