५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

तुमच्या ब्लॉगवर right-click कशी Disable कराल?(भाग-१)

मित्रांनो तुमच्या अनुदिनीवरून तुमचे लिखाण कॉपी पेस्ट होणे ही आता काही नविन गोष्ट राहिलेली नाही..नेट म्हटले की कॉपी-पेस्ट करणारे सुद्धा त्या जोडीला आले.आज पासून सुरु होणार्‍या लेखमाले मध्ये मी तुमच्या ब्लॉगवरची चोरी कशी थांबवायची?कशी पकडायची याची माहिती करून घेणार आहोत..सुरुवात अगदी साध्या पद्धतीने करून अधिकाधिक प्रगत पद्धतीने ती कशी रोकता येईल,कमी करता येईल याची आपण माहिती करून घेवू या.
आजची पद्धत अत्यंत साधी-सोप्पी आहे...त्या साठी काही कोड तुम्हाला तुमच्या अनुदिनी मध्ये डकवायचे आहेत...याने तुम्ही चोरी थांबवू शकत नसलात तरी समोरच्याला याचा अंदाज येवू शकतो..की लेखक त्याच्या अनुदिनीवरून होणार्‍या लिखाणाच्या कॉपी बद्दल जागरूक आहे...कारण काही वेळा कॉपी करण्याचे प्रकार चुकून घडत असतात..तर बहुतेक वेळा जाणून-बुजून केले जातात..
अश्या जाणकार लोकाना तुम्ही कॉपी करत आहात याची जाणीव तुम्ही या निमित्ताने करून देवू शकता.
हे कसे कराल?


१)यासाठी तुमच्या ब्लॉगच्या Design>Page Elements>add gadget मध्ये जावून Html/Java Script पर्यांय निवडा.

२)या नंतर खाली दिलेला कोड सिलेक्ट करून ctrl+c(कॉपी) करा.मग कोड चित्रामध्ये दिसतो त्या प्रमाणे ctrl+v (पेस्ट) करा.यानंतर save करायला विसरू नका.
<script language="JavaScript">

 var message = "sorry....the work is copyrighted"; 
 function rtclickcheck(keyp){ if (navigator.appName == "Netscape" && keyp.which == 3){  alert(message); return false; } 
 if (navigator.appVersion.indexOf("MSIE") != -1 && event.button == 2) {  alert(message);  return false; } } 
 document.onmousedown = rtclickcheck;
</script>
३)आता जर कोणी तुमच्या ब्लॉगवर right-click करून तुमच्या ब्लॉगवरचे लिखाण कॉपी करण्याचा प्रयत्न केला तर त्याना खालील चित्रामध्ये दाखविल्याप्रमाणे सुचना दिसेल..यावरून त्याना याची जाणिव होईल की लेखक त्याच्या अनुदिनीवरून होणार्‍या लिखाणाच्या चोरी बद्दल जागरूक आहे.

पुढच्या भागात दुसर्‍या विविध पद्धतींची आपण माहिती करून घेवू या.
अश्याच अनेक तंत्र-मंत्राची माहिती हवी असेल तर आजच फेसबूक वरच्या पानावरील लाईक वर टिचकी देवून सहभागी व्हा.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर

गुगलप्लसवर शेअर करा

About प्रशांत दा.रेडकर

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

    Blogger Comment
    Facebook Comment

8 comments:

  1. खरे तर मी हि काळजी अगदी अगोदरच स्वतः लेखक नसूनही का कोण जाणे पण उगीच घेतली होती तरी हि आपली हि पोस्ट यायला नि माझ्या ब्लॉग वरील चांगल्या नोकरीच्या शोधात आहात? हि मी नुकतीच प्रकाशित केलेली पोस्ट अगदी जशीच्या तशी टायटल सहित दुसऱ्या ब्लॉगवर मला बघायला मिळायला एकच गाठ पडली त्यामुळे परत एकदा तपासून पाहतो.मी राईट क्लिक डिसेबल करून सुद्धा हे कसे घडले? मला तर ह्याचेच आश्चर्य वाटते.

    ReplyDelete
  2. right-click Disabled करून दिलेली सुरक्षा खुपच सामान्य आहे...त्यातून फक्त तुम्ही कॉपी करणार्‍याना सुचित करू शकता की कॉपी करू नका..पण करणारे तरीही करतात...या चोराना कसे पकडायचे त्याची माहिती येत्या काही लेखामध्ये आपण पाहू या. :-)

    ReplyDelete
  3. धन्यवाद,मराठी ब्लॉगिंगमध्ये अधिकाधिक सुंदर,दर्जेदार ब्लॉग निर्माण व्हावे यासाठी ब्लॉगिंगचे तंत्र-मंत्र विभाग सुरु करण्याचा माझा हेतू होता..तो हळूहळू साध्य होतो आहे..तुमच्या प्रतिक्रिये बद्दल आभार.:-)

    ReplyDelete
  4. नमस्कार,
    मी आपल्या व इतर काही ब्लॉगजवरील ब्लॉग निर्मीतीसंबंधी लेख वाचून माझा नवीन ब्लॉग सुरु केला आहे. म्हणजे त्यासंबंधी अजून तशी जास्त माहिती मला नाही पण हळूहळू शिकतो आहे. आपले लेख खूप मदत करतात. आताच इथे दिलेला कॉपीराईट संबंधी लेख वाचून माझ्या ब्लॉग वर त्याप्रमाणे केले आहे.
    अशीच उपयुक्त माहिती देत जावी ही विनंती.

    -विवेक वाटवे
    [email protected]

    ReplyDelete
  5. मी आपल्या एका लेखात अनुक्रमणिका कशी करावी ते वाचून त्याप्रमाणे ती माझ्या ब्लॉगवर तयार केली पण पोस्टची लिंक त्यात कशी द्यावी ते मला कळत नाही, प्लीज जरा सांगाल का?
    आभारी होईन.

    -विवेक वाटवे
    [email protected]

    ReplyDelete
  6. अनुक्रमणिका बनल्या नंतर तो दुवा कॉपी करा आणि लेआउट मध्ये जावून पेजेस पर्यांयाचा वापर करून त्यात तो दुवा पेस्ट करा

    ReplyDelete