५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

तुमचा Wordpress Blog घरच्या संगणकावर कसा सुरु कराल? (भाग-२)

मित्रानो Wordpress Blog घरच्या संगणकावर  सुरु(होस्ट) करण्यासाठी आपल्याला xampp ची गरज असते तो कसा इन्स्टॉल करायचा ते आपण तुमचा Wordpress Blog घरच्या संगणकावर कसा सुरु कराल? (भाग-१) मध्ये पाहिले.

आता आपण पुढील माहिती घेणार आहोत.

हे कसे कराल?



१)प्रथम http://wordpress.org/download/ या लिंक वर जावून zip फॉर्मट मधली 3.0 MB ची फाईल डाऊनलोड करा.

२)यानंतर ती zip फाईल unzip करून (फाईल unzip करण्यासाठी winrar अथवा winzip चा वापर करावा) त्यातील wordpress नावाचे फोल्डर कॉपी करा आणि ते C:\xampp\htdocs मध्ये पेस्ट करा.

(्विशेष सुचना: जर काही जण wamp वापरत असतील तर बाकी सर्व सारखेच आहे फक्त तुम्हाला wordpress नावाचे फोल्डर "wamp" च्या www डिरेक्टरीमध्ये कॉपी करावे लागेल.)

३)आता तुमच्या वेबब्राउजर मध्ये http://localhost/wordpress टाईप करा.(असे करण्याआधी xampp सुरु असणे गरजेचे आहे )

४)असे केल्यावर तुम्हाला खालील चित्रामध्ये दाखविल्याप्रमाणे मॅसेज दिसेल.त्यातील Create a Configuration File नावाच्या दुव्यावर टिचकी द्या.


५)असे केल्यावर पुढील विंडो मध्ये खालील चित्रा प्रमाणे संदेश दिसेल.त्यातील Let’s go! या पर्यांयावर टिचकी द्या.


६)असे केल्यावर जे पान उघडेल ते तुमच्या साईटसाठी लागणार्‍या Database ची माहिती मागेल,पण आपल्या कडे सध्या तो नसल्यामुळे आपल्याला तो तयार करावा लागेल.

७)हे करण्यासाठी ते पान तसेच ठेवून वेब ब्राऊजरच्या दुसर्‍या टॅब मध्ये तुम्हाला http://localhost/phpmyadmin टाईप करावे लागेल. असे केल्याने खालील चित्राप्रमाणे पान उघडेल.

८)त्यातील Create new database खाली जी रिकामी जागा दिसते त्यात तुमच्या डेटाबेसचे नाव द्या उदा.wordpress आणि त्या नंतर Create वर टिचकी द्या.

९)असे केल्यावर तुमच्या साईटचा डेटाबेस तयार होईल,आता जे पान उघडलेले असेल त्यावर बरेच पर्यांय असतील त्यातीलPrivileges या पर्यांयावर टिचकी द्या.

या नंतर त्याच पानावर असलेल्या Add a new User दुव्यावर टिचकी द्या.

१०)आता जे नविन पान उघडेल त्यावर खालील प्रमाणे Add a new User नावाचा पर्यांय दिसेल.
त्यातील १) User name: समोर नाव द्या उदा. wordpress
२) Host: समोरील डॉप-डाऊन मेनू मधून Local ची निवड करा.
३)Password आणि Re-type: मध्ये हवा तो पासवर्ड द्या..


११) यानंतर Global privileges समोरील Check All वर टिचकी द्या आणि मग तळाला असलेल्या Go पर्यांयावर टिचकी द्या.


असे केल्याने तुमचा डेटाबेस आणि यूजर रेकॉर्ड तयार झाला.

१२)आता पायरी क्रमांक ६ मध्ये जिथे आपल्याकडे डेटाबेसची माहिती मागितली होती तिथे आपण आताच जो डेटाबेस तयार केला त्याचे नाव,युजरनेम आणि पासवर्ड द्या.Database Host समोर localhost आणि Table Prefix:wp_ तसेच राहू द्या. मग Submit वर टिचकी द्या.

१३)पुढील पानावर Run the install नावाचा पर्यांय येईल त्यावर टिचकी द्या.

१४)असे केल्याने जे पान उघडेल त्यावर तुमच्या साईटचे नाव,पासवर्ड इत्यादी माहिती द्या आणि Install Wordpress वर टिचकी द्या.

१५)आता तुम्हाला Wordpress यशस्वीरित्या इन्स्टॉल झाले असा संदेश येईल. मग तुमचे युजरनेम आणि पासवर्ड वापरून तुम्ही तुमच्या साईटच्या Dashboard वर लॉग-ईन होवू शकता.
डायरेक्ट लिंक
http://localhost/wordpress/wp-login.php



१६)अभिनंदन आताच तुम्ही तुमची wordpress site तुमच्या संगणकावर होस्ट करण्यात यशस्वी झाला आहात.:-)


१७)साईट बघण्यासाठी खाली दिलेला दुवा तुमच्या वेबब्राउजर मध्ये टाईप करा.
http://localhost/wordpress/


१८)पुढच्या भागात Themes इत्यादी तुमच्या संगणकावरच्या wordpress site वर कसे बदलायचे याची माहिती करून घेवू.

धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर.


गुगलप्लसवर शेअर करा

About प्रशांत दा.रेडकर

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

    Blogger Comment
    Facebook Comment

3 comments:

  1. प्रशांत जी, आपले ज्ञान आमच्या बरोबर वाटल्याबद्दल खुप खुप आभार. परंतु माझ्या बाल बुद्धीला काही प्रश्न पडले आहेत कृपया त्याची उत्तरे द्या.

    १) आपला इतका सुंदर ब्लॉग असूनही आपण Admaya च्या जाहिराती का वापरता ? (payout is very low)

    2) मला फोरम आणि फेसबुक ची स्क्रिप्ट कोठे मिळेल ?

    ३) आपली साईट एकाच ठिकाणी होस्ट करून ती बहुभाषिक कशी करावी ?


    धन्यवाद

    ReplyDelete
  2. तुमच्या प्रश्नांची उत्तरे:
    १):D माझ्याकडे फार पुर्वी पासुन Admaya चे खाते होते.म्हणून मी ते तळाला टाकून दिले...माझ्याकडे Google AdSense चे खाते सुद्धा आहे.आता डोमेनसुद्धा. पण मी त्या जाहिराती समाविष्ट करायचा कंटाळा केला.

    २)चर्चापीठची स्क्रिप्ट मिळवण्यासाठी साईटच्या अनुक्रमणिकेमध्ये ब्लॉगिंगचे तंत्र आणि मंत्र विभागात त्याची माहिती दिलेली आहे.

    ३)साईट एकाच ठिकाणी होस्ट करून ती बहुभाषिक करण्यासाठी तुम्हाला ती Drupal वापरून बनवावी लागेल.

    ReplyDelete
  3. कृपया मराठी navigation साठी सोय उपलब्ध करून दयावी

    ReplyDelete