५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

Internet Identity Theft म्हणजे काय?त्यापासुन स्वत:ला कसे सुरक्षित ठेवाल?

Internet Identity Theft म्हणजे काय?
मंडळी हल्ली इंटरनेटचा वापर वाढत चाललेला आहे,त्यातूनच Internet Identity Theft चे प्रमाण वाढत चाललेले आहे,थोडक्यात सोप्प्या शब्दात सांगायचे झाले तर तुमची खाजगी माहिती चोरून त्याचा होणारा गैरवापर. चोरीचा हा प्रकार जास्त भयानक आहे..कारण ज्याची चोरी झालेली असते त्याला बहुतेक वेळा ते माहितच नसते आणि ज्यावेळी कळते तेव्हा खुप उशीर झालेला असतो.

इंटरनेट Identity Theft हा प्रकार कसा कार्य करतो?


तुम्हाला याची कल्पना नसेल की तुमचा संगणक तुमच्या विषयीची सर्व माहिती गोळा करतो आणि ती तुमच्या संगणकाच्या हार्डडिस्क वर लपवून ठेवतो.उदा. कॅच,ब्राउजर हिस्ट्ररी आणि temporary Internet फाईलचा वापर तुमचा ऑनलाईन वापर जाणण्यासाठी होतो.या फाईल मध्ये तुमचा पासवर्ड,तुमच्या खात्याची माहिती,नाव,पत्ता,तुमचा credit card number इत्यादी माहिती दडलेली असते.
चोर तुमची माहिती २ प्रकारे चोरू शकतो.
१)तुमच्या असुरक्षित Internet वापरातून स्थानांतरीत होणारी माहिती चोरून
२)तुमच्या संगणकावर spyware नावाचा सॉफ्टवेअर प्रोग्राम इनस्टॉल करून "जो तुमच्या संगणकावरची माहिती चोरून ती त्या चोराकडे पाठवतो.

या चोरी पासुन स्वत:ला कसे वाचवाल?

१)सतर्क रहा: 
तुमच्या मित्रपरिवारात कोणालाही समाविष्ट करताना काळजी घ्या.तुमचा लॅपटॉप अथवा संगणक अनोळखी व्यक्तींच्या सानिध्यात असताना तसाच सुरु ठेवून जावू नका.तुमची खाजगी माहिती सोशलनेटवर्किंग साईटवरच्या अनोळखी व्यक्तीला देवू नका.तसेच अनोळखी इपत्त्या वर आपली खाजगी माहिते कळवणे टाळा.
आपण आपली माहिती खर्‍या साईटवर देतो आहोत ना याची शहानीशा करा..उदा. फेसबुक,जीमेल वापरताना वेबपत्याआधी https:// चा वापर करा..अशी साईट सुरक्षित असते.

२)Cache आणि Temporary Internet Files =
तुम्ही इंटरनेट वापरताना तुमचे पासवर्ड,तुमची खाजगी माहिती तुमच्या ब्राउजरच्या लक्षात राहते..त्यामुळे वापर करून झाल्यावर History काढून टाकायला विसरू नका.असे केल्याने सर्व माहिती निघून जाते.ही सवय तुम्हाला hacker पासून काही प्रमाणात वाचवते.

३)Antivirus आणि Firewall :  
याचा वापर अवश्य करा..ही काळाची गरज आहे त्यासाठी मान्यताप्राप्त कंपनीची total internet security घेणे केव्हाही चांगले.ती तुमच्या संगणकाची सुरक्षितता वाढवते.
उदा.McAfee अथवा Norton सारख्या इतर बर्‍याच कंपन्या अशी सॉप्टवेअर सेवा देतात.

४)तुमच्या इंटरनेट वापरावर लक्ष ठेवा
तुम्ही जेव्हा इंटरनेटचा वापर करत नसाल तेव्हा ते कनेक्शन बंद ठेवा.कारण इंटरनेट कनेक्शन शिवाय एखाद्या hacker ला तुमच्या संगणकाचा ताबा घेणे अथवा त्याला दुरुन नियंत्रित करणे कधीही शक्य नसते. :-)

धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
गुगलप्लसवर शेअर करा

About प्रशांत दा.रेडकर

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

    Blogger Comment
    Facebook Comment

3 comments:

  1. छान सर,खरच तुमचा ब्लॉग वाचून मला भरपू मदत मिळाली. आणि ब्लॉग लिहिण्यासाठी मदत ही झाली. मला माझ्या ब्लॉग साठी एक ओळख चिन्ह तयार करायचे आहे. त्याबद्दल मला जरा माहिती अथवा ते कोणत्या साईड वरून कसे तयार करायचे त्याबद्दल जरा सांगा. मी माझ्या ब्लॉगची लिंक आणि इमेल आयडी देत आहे
    http://mankallol.blogspot.com/
    [email protected]

    ReplyDelete
  2. छान सर, तुमचा ब्लॉग वाचून मला भरपूर माहिती मिळाली आणि ब्लॉग लिहिण्यासाठी ही मदत झाली. मला माझ्या ब्लॉग करिता एक ओळख चिन्ह तयार करायचे आहे. तेव्हा ते कसे व कोणत्या साईड वरून करायचे या बद्दल जरा सांगावे. मी माझ्या ब्लॉगची लिंक खाली देत आहे.
    http://mankallol.blogspot.com/
    ईमेल आयडी - [email protected]

    ReplyDelete
  3. मी आज अथवा उद्या या विषयावर लिहिन :-)

    ReplyDelete