धन्यवाद मंडळी,
आज माझ्या अनुदिनीच्या वाचक संख्येने २ लाखाचा आकडा पार केली..त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार! :-)
मी जे जे स्वत: करून पाहिलेले आहे,वाचलेले आहे,अनुभवलेले आहे, ते ते सर्व मी या अनुदिनीच्या माध्यमातून तुमच्या सोबत वाटून घ्यायचा कायम प्रयत्न केला आहे.
जाणून बुजून राजकिय,सामाजिक,जातीय तेढ,तणाव निर्माण करेल असे लिखाण करणे टाळत आलो आहे (असे लिखाण करणे सर्वात सोप्पे असते आणि माझ्या शब्दांना लाभलेली धार मी जाणून आहे म्हणून मी ते टाळतो.)मराठी मध्ये अधिकाधिक चांगल्या अनुदिन्या निर्माण व्हाव्या म्हणून ब्लॉगिंगचे तंत्र -मंत्र विभागाची निर्मिती झाली आणि स्वत: केलेल्या चुका इतरांकडून होवू नये
या साठी लिखाण करण्याची काळजी घेतली गेली.माझ्या कविता,चारोळ्या,मी लिहिलेल्या लघुकथा,लेख इत्यादी सुद्ध्या या माध्यमातून मी तुमच्या पर्यंत पोहोचवले.
फेसबुकचे तंत्र-मंत्र,जीमेलचे तंत्रमंत्र,इंटरनेट आणि नेटवर्क सिक्युरिटी,वर्डप्रेस असे विभाग हळू हळू या लिखाणातून निर्माण झाले.याच छंदातून शिकता शिकता
आणि मराठी भाषेच्या प्रेमातून www.marathifanbook.com या मराठी माणसाच्या मराठी फेसबुकची निर्मिती करणे मला शक्य झाले.दीड वर्ष मी या साईटच्या निर्मितीसाठी ओपन सोर्स सॉफ्टवेअर आणि स्वत:चे डोके वापरून फेसबुक सारखी साईट तयार करू शकलो याला सुद्धा हा ब्लॉगिंगचा छंद कारणीभूत ठरला.
इथे लिहिलेला प्रत्येक शब्द,अनुभव माझा आहे,आणि मी तो तुमच्या सोबत वाटून घेतालेला आहे आणि हेच कारण आहे की या साईटचे नाव प्रशांत रेडकर सोबत.इन असे आहे. :-)..याच ब्लॉगिंगचा छंदामुळे बुकगंगा तर्फे आयोजित करण्यात आलेल्या विश्वसाहित्य संमेलनात मला "आवडता ब्लॉगर " म्हणून सर्वाधिक पसंती आणि पहिले पारितोषिक मिळाले त्या बद्दल सुद्धा तुम्हा सर्वांचे मनापासून आभार.
मराठी शब्द,मराठी बातम्या,मराठी ब्लॉगविश्व असे विभाग मराठी वरील प्रेमातून निर्माण होत गेले.त्यात विरंगुळा म्हणून मराठी विनोद, मराठी सुविचारांची भर पडली.
इंटरनेट,मोबाईल,संगणक वापरताना मला आलेल्या अडचणीतून इंटरनेट,मोबाईल टिप्स ट्रिक्स,संगणकाचे तंत्र-मंत्र,उपयुक्त सॉफ्टवेअर असे विभाग बनत गेले.जसजसे माझे अनुभव वाढत जातील तसतसे विभाग सुद्धा वाढत जातीलच :-)
मराठी मध्ये गाणी,म्हणी इत्यादी विषयांवर लिहीलेले ब्लॉग अनेक आहेत पण जर आणखी नवीन विषयावर ब्लॉग निर्माण होणार असतील तर अश्या नवख्या ब्लॉगर्सना मी मदत करायला नेहमीच तयार आहे. :-)
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
प्रशांतजी आपला ब्लॉग आम्हासारख्या नवख्या ब्लॉगर्सना खरच प्रेरणादायी तसेच मार्गदर्शक आहे. आपल्या परिश्रमांना त्रिवार धन्यवाद आणी २,००,००० पृष्टदृश्ये पुर्ण झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन..!!
ReplyDeleteमाझ्या ब्लॉग्स वर नजर टाकावी आणी अजुन आकर्षक आणी उत्तम कसा करता येईल याबद्दल सुचना द्याव्यात हि विनंती. धन्यवाद.
मराठी- www.dimwa.tk
इंग्रजी- www.blogedia.in
आणी ज्याचा नुकताच जन्म झालाय असा
www.mymarathmoli.blogspot.com
पुनश्य धन्यवाद..!! आपल्या ब्लॉगची २०,०००,००० पृष्टदृश्ये लवकरच पुर्ण व्हावीत हीच ईश्वरचरणी प्रार्थना...!!
आपला नम्र
यशोधन प्र. वाळिंबे
धन्यवाद,२ साईट आणि एक अनुदिनी पाहिली..छान आहे.
ReplyDeleteब्लॉगिंगचे तंत्रमंत्र विभागामध्ये संपूर्ण माहिती असलेले लेख वाचायला मिळतील.