मंडळी,
तुम्ही जेव्हा डिजिटल कॅमेराने फोटो काढता तेव्हा तो काही MB मध्ये असतो.उदा. एका छायाचित्राचा आकार 2MB,8MB,12MB असा असतो.तुम्ही सारखे फोटो काढत असाल तर काही दिवसातच तुमच्या संगणकाची डीस्क भरून जाते.(माझे अनुभवाचे बोल)मग यावर उपाय काय? छायाचित्राच्या मुळ स्वरूपाला धक्का न लावता त्याचित्राचा आकार कमी करणे शक्य आहे का? तर याच उत्तर "होय"असे आहे.
हे करण्यासाठी खाली दिलेळी वेबसाईट तुमच्या वेब ब्राउजरमध्ये उघडा
http://www.jpegmini.com/
याला दोन पर्याय आहेत.
१)त्यातला पहिला पर्याय त्याची ऑनलाईन सेवा वापरून
२)त्यांचा software प्रोग्राम विकत घेऊन वापरणे अथवा ट्रायल प्रोग्राम डाउनलोड करून वापरणे(पण ट्रायल प्रोग्रामला मर्यादा आहेत.)
आपण तिथे पहिला पर्याय जो मोफत आहे तो कसा वापरायचा ते बघणार आहोत.
वेबसाईट वेबब्राउजर मध्ये उघडल्यावर अपलोड फोटो नावाचा जो पर्याय दिसेल त्यावर टिचकी द्या
३)आता जे पान उघडेल त्यावर चित्रात दाखविल्या प्रमाणे Drop PHOTO HERE अथवा Press to upload Photo" पर्याय दिसेल.
कोणताही एक पर्याय वापरून तुम्ही तुमचा फोटो अपलोड करा.
४)आता मी 649 KB चे चित्र अपलोड केले आणि त्या ऑनलाईन प्रोग्रामने त्याचा आकार कमी करून
126 KB केला आणि मुळ चित्राच्या रंगामध्ये काही बदल झाला नाही.
अश्या प्रकारे मला मुळ चित्र जसेच्या तसे मिळालेच पण त्याची साईज सुद्धा कमी झाल्याने माझ्या संगणकावरची जागा देखील वाचवण्यात मला यश आले.
Download Full Res. पर्याय वापरून आपण ते चित्र संगणकावर डाउनलोड करून घेवू शकतोस.
या व्यतिरिक्त त्यांचा ट्रायल प्रोग्राम डाउनलोड करून ऑफलाईन तुमच्या संगणकावर वापरायची सोय देखील आहे.पण त्याला मर्यादा आहेत.पण तुम्ही प्रोफेशन फोटोग्राफर असाल किंवा तुम्हाला फोटोग्राफिची आवड असेल तर तुम्ही त्यांचा पेड प्रोग्राम डाउनलोड करून वापरू शकता.जो खरच उपयोगी आहे.
धन्यवाद!
तुमचा मित्र,
प्रशांत दा.रेडकर.

0 comments:
Post a Comment