५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

बघितलस,आज खुप आठवते आहेस,सगळं विसरुन सुद्धा....




नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
आज मी लघुकथा लिहिण्याचा आणखी एक प्रयत्न केलेला आहे.बघा माझा हा प्रयत्न तुम्हाला कितपत आवडतो..चुका असतील तरी जरुर कळवा.









******************************************

बघितलस,आज खुप आठवते आहेस,सगळं विसरुन सुद्धा....
*******************************************
©प्रशांत दा. रेडकर.
*************
आज संध्याकाळी का कुणास ठाऊक खुप उदास वाटत होतं, मावळतीला कललेल्या सुर्याचा तो परिणाम होता की संपत आलेल्या आयुष्याचा, देव जाणे. पण असं एकटं एकटं कधीच वाटलं नव्हतं..डोळे बंद करुन सुर्याच्या सोनेरी किरणांना अंगावर झेलत होतो...आणि कधी तिचा निरागस चेहरा मनाच्या आरश्यावर प्रतिंबिब उमटवून गेला..माझं मला सुद्धा कळलं नाही....

हो आज खुप आठवते आहेस,सगळ काही विसरुन सुद्धा.तुझं ते नजरेतून बोलणं,ओठ मुडपून हसणं...सगळं सगळं आठवतय आज.....आठवतयं तुला किती भांडायचो आपणं,मग तू अबोला धरायचीस,मी तुझी समजुत काढताना,रडकुंडीला यायचो......मग तु मात्र खटयाळ हसुन माझे गाल ओढायचीस.....मी मात्र तुझे ते रूप डोळ्यात साठवून घ्यायचो......मनात उठणाऱ्या असंख्य वादळाना संयमाने शमू द्यायचो.......

आठवतयं तुला? गाण्यासाठी किती हट्ट करायचीस....पुर्ण यादी शोधून दे.....नाही दिली की रागवायचीस. आठवतयं तुला?कधी भेटलीस की किती शांत असायचीस....मी एकटाच बडबड करायचो...तू फक्त ऐंकायचीस.......तुला घरी सोडताना,नेहमी वळून बघायचीस.....तेव्हा खर सांगू,तू खुप मासूम दिसायशीच.

हो आज खुप आठवते आहेस...सगळं काही विसरुन सुद्धा....का???ते विचरते आहेस :)
आज इतकी दुर निघुन गेलीस की मनात असुन सुद्धा तुझ्या कडे येवू शकत नाही मी.....सवयीची नसताना ही माझी सवय होवून गेलीस.....तू नाहीस तर बघ ना हे लोक मला माणुस समजत नाहीत....सगळ्यांच्या वापराची एक वस्तू झालो आहे मी फक्त......हजेरी लावण्या पुरती माणसे येतात आयुष्यात...काम झाले की निघुन जातात....त्यांच्या जगा मध्ये.......माझे जग अजुन सुद्धा तुझ्या मध्येच आहे.....तसे ते तुझ्या शिवाय वेगळे होतेच कुठे???

आज तू विचारते आहेस की तू इतकी का आठवतेस?...अग आठवण्या साठी आधी विसराव लागत....तुला इथे विसरले कोण आहे????.....माणसे देवा घरी गेली की आकाशातला तारा बनतात......आता तुच सांग मला,तुला मी कोणत्या क्षितीजा वर शोधू???इथे तर पूर्ण आकाशच लुकलुकनाऱ्या ताऱ्यानी व्यापले आहे....तिथे तुझी ओळख सांग ना मला....मला ही तुझ्या भेटीसाठी यायचे आहे.

आज ही तो दिवस आठवतो......मोबाईल ची रिंग वाजली, मी गडबडी मध्येच फोन उचलला."जिथे असशील तिथुन श्रीराम हॉस्पीटल मध्ये लवकर पोच,"असा तुझ्या बाबांचा कापरा आवाज ऐंकला आणि क्षणभर सुन्न झालो....काय झाले काही कळेना, काय करावे ते ही सुचेना....तसाच लगबगीने हॉस्पीतल मध्ये पोहोचलो...... तुझ्या बाबांचा पडलेला चेहरा पाहीला....पाया खालुन जमिन सरकली क्षणभर.....विचारले", काय झाले?काहि कळेल का?". तुझ्या बाबांचा आवाज ऐंकला,"उद्या तुझा वाढदिवस होता ना,म्हणुण ती तुझ्या साठी गिफ़्ट आणायला गेली होती,घरी येताना भरधाव येणाऱ्या गाडी ने उडवले तिला....चालक मद्यधुंद अवस्थे मध्ये होता.....माझी लेक रक्ताच्या थारोळ्या मध्ये तडफडली रे...लोकांच्या मदतीने तिला हॉस्पीटल मध्ये आणली पोलीसानी..मग आम्हाला कळवले.

मी: कशी आहे ती आता? मला तिला पाहायचे आहे?

बाबा काहीच बोलले नाही.....मग मीच धीर करुन वॉर्ड कडे पावले वळवली.....तुझ्या आईचे ते रडणे ऐकले आणि माझा बांध सुटला....तुझ्या चेहऱ्याकडे पाहिले, आज ही किती मासुम दिसत होतीस तू....म्हणालो," बोल ना माझ्याशी....मला तुझ्याशी भांडायचयं,मग खुप खुप बोलायचयं....तुझा रुसवा काढताना,मला तु खुप रडवायचयं...पण तू नेहमी बोलत रहा...मी नाही राहू शकत तुझ्या शिवाय...

बाबांनी येऊन माझ्या खाद्यांवर हात ठेवला....म्हणाले,"ती आपल्यात नाही आहे.तुला यायला थोडा उशीर झाला...मघाशी सांगायचा धीर नाही झाला मला....जाण्या आधी इतकेच म्हणाली,"मला त्याच्या सोबत बोलायचे होते एकदा....त्याचा वाढदिवस आहे उद्या, त्याला मी आणलेले गिफ्ट द्यायचे आहे." असे बोलुन तुझ्या बाबांनी एक लिफाफा माझ्या हाती दिला.


जड मनाने,कापऱ्या हातानी मी तो उघडला........माझ्या साठी घेतलेले एक घडयाळ आणि एक पत्र होते त्यात....."भेटीच्या वेळा पाळत नाही ना मी...म्हणुन दिलेस ना मला???....बघ ना, शेवटी पोहोचताना पण उशीरच केला मी...

मग तुझे पत्र वाचू लागलो मी....


" मी कधीच तुझ्याशी बोलत नाही,
तुझ्या कविताच माझ्याशी बोलतात.
ओठात अडकलेले शब्द मग,
पापण्या मिचकावून सांगतात."

वाढदिवसाच्या खुप साऱ्या शुभेच्छा.....बघ मी पण शिकले कविता करायला....आता या तुझ्या कवितेला कायम तुझ्या घरी घेवुन जा....उशीर केलास तर मी दूर निघुन जाईन हा....मग म्हणू नकोस मी तुला रडवते.....माझ खुप प्रेम आहे तुझ्या वर,कायम मला सोबत दे,माझ्या सोबत रहा.
तुझी.
॑॑॑॑॑॑॑॑॑॑॑

सुर्य कधीच मावळला होता....अंधार दाटुन आला..मी भाना वर आलो , पाहिले तर घडयाळा मध्ये ८ वाजले होते.मी घरी निघालो,जे आजही माझ्या सारखे एकटेच होते,माझी वाट पाहात.
सहज काही कवितेच्या ओळी ओठा वर आल्या आणि त्या सुद्धा फक्त तुझ्या साठी...
"बहर ओसरला ग आता,
बहर ओसरला.......
देव देखील या वेळी,
मला जवळ घ्यायला विसरला.

बघितलस,"आज खुप आठवते आहेस....सगळं विसरुन सुद्धा.".

©प्रशांत दा. रेडकर.
**************************************************************************
गुगलप्लसवर शेअर करा

About प्रशांत दा.रेडकर

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

    Blogger Comment
    Facebook Comment

15 comments:

  1. prashant, apratim aahe lekh...sundar ekdam...khup chan kalpana keliye...jase kahi tu te swataha anubhavle aahes...
    aankhin kahi lekh lihi...
    al d best

    ReplyDelete
  2. प्रशांत खर सांगु....रडले मी खुप....

    वेळेच महत्त्व मी जाणते...

    अप्रतिम्....हा एकच शब्द....

    ReplyDelete
  3. Itki sundar ahe ki vachta vachta dole kevha bharun ale maza malach nahi kalala...!!

    ReplyDelete
  4. Prashu story kharach chan aahe...
    pn ajun thoda neat touch de... thodi ajun ulgadun yeil...

    keep the good work going man...

    ReplyDelete
  5. prashant .... ' tu aaj aathwtw ' wachtana tu mala junya aathwanit gheun gelas.... realy nice one... aaj ti aathwali an dolyatun pani kadhi aale kahi samajlech nahi.... keep it prashant....
    Regrds
    Rishi...

    ReplyDelete
  6. Prashant
    Khup sundar laghukatha ahe kharech.
    Mala tar janu he sagle pratyakshat ghadat ahe asech vatle.
    Kharech aapla manus aplyala sodun gelyavar kiti tras hoto nahi .
    Vachatana khup vait vatat hote.
    pan khup sundar kalpana mandali ahe
    Ayushyat nehmi asech pudhe ja.
    Pan veleche & aaplya mansanche bhan tevha.
    Ani tumche kahi lekh astil tar mala jarur pathava.
    mala avdatil te vachayla.
    Ayushyat nehmi aplya mansanchi kadar tevha nehmi.
    Best of Luck for ur future.

    From
    Susha.

    ReplyDelete
  7. ऋषी,सुश,मनापासुन धन्यवाद

    ReplyDelete
  8. I accidently happen to visit your blog, but I couldnt stop myself from reading all of your 'laghukatha'. छान लिहिले आहे, मुख्य म्हणजे तुम्ही खुप संवेदनशील मनाचे आहात हे कळाले. आजकालच्या जगात इतके संवेदनशील पुरुष देखिल आहेत हे वाचुन आनंद झाला.(:D) अर्थात संवेदनशील आहात म्हणुनच तुम्ही कविता आणि लेख लिहिता.
    Visit my blog too, I have just started blogging, BTW I am also an engineer by profession

    ReplyDelete
  9. वर्षा,
    अभिप्रायाबद्दल मनापासुन आभार.
    अभियंते खुप संवेदनशील असतात.[:)]

    ReplyDelete
  10. hi prshant ajj accidentally me tmcha blog var visit kali pan me jehvha ha lekh vachala tevha me maza dolayatlay pani rokhu shkalay nahi kharch aprtim ahy tumcha lekh ha lekh jo tumhi lihla ahy tay satay ahy ka manjay hay tumchya sobat gadlay ahy ka kalpnik ahy pan vachatana vatay ki hay gadlay ahy asaych chhan lekh liha all the best

    ReplyDelete
  11. राणी..तुमच्या शुभेच्छा आणि प्रतिसादा बद्दल मनापासुन धन्यवाद

    ReplyDelete
  12. खुप छान
    वाचुन डोळ्यात पाणी आलं

    ReplyDelete
  13. Shabd nahit.......Mitra manatle vichar kagdavar kashe utravayche sangshil ka Karan mala khup adchan yete majhi kalpna mandyala

    ReplyDelete