५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

तुमचा ब्लॉग जगभर दिसतो कसा ते कसे पाहाल?

आपण सर्व आपल्या ब्लॉगसाठी दुसरीकडून मिळणारी templates वापरतो..त्याचा "Preview" आपल्या स्वत:च्या घरी पाहतो, तसाच तो जगभरातील संगणकावर दिसत असेल अशी समजूत करून घेतो.
तुमचा ब्लॉग Firefox 2/3, Internet Explorer 6/7, Safari 3.1, Opera 9.5 and Google Chrome या नावाजलेल्या browsers मध्ये कसा दिसतो याची टेस्ट घेणे गरजेचे आहे.

खाली दिलेल्या लिंकचा वापर करून तुम्ही ते घर बसल्या सहज टेस्ट करू शकता.

त्यासाठी फक्त इतकेच करा

१)प्रथम "Blog-Test"या लिंक वर टिचकी द्या.

२)जे नविन पान उघडेल त्यात खाली दिलेल्या चित्रा प्रमाणे तुमच्या ब्लॉगचा पत्ता द्या...


     तुम्हाला जर तुमचा ब्लॉग विंडोज,लिनक्स,मॅक वरच्या वेब ब्राउजर वर कसा दिसतो ते पाहायचे असेल तर दिलेल्या लिस्ट मधील सर्व ५५ ब्राउजर तुम्ही सिलेकट करू शकता अथवा ठराविक ब्राउजर जे जगभर जास्त वापरले जातात त्याची तुम्ही निवड करू शकता.
(टिप: जास्त browsers  निवडल्यास टेस्ट साठी लागणारा वेळ वाढू शकतो.)
आता "submit" बटनावर क्लिक करा.

३)एक नविन वेबपेज उघडेल त्यात तुम्हाला तुम्ही निवडलेल्या browsers ची माहिती आणि संपुर्ण प्रक्रिया पुर्ण होण्यासाठी लागणारा कालावधी यांची माहिती असेल.



४)त्याच पानावर (Details) वर क्लिक केल्यावर तुम्हाला प्रक्रियाची सखोल माहिती मिळेल.

                              
५)एकदा का प्रक्रिया पुर्ण  झाली की तुम्हाला तुमच्या ब्लॉगचे स्क्रीनशॉट पाहता येतील अथवा डाउनलोड ऑल लिंकचा वापर करून ते तुम्ही ऑफलाइन सुद्धा पाहू शकता.

CO.CC:Free Domain

धन्यवाद
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर.
गुगलप्लसवर शेअर करा

About प्रशांत दा.रेडकर

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

    Blogger Comment
    Facebook Comment

2 comments:

  1. nice information.
    just checking my site also.
    I am surprised, you have written such a nice blogs and tips but nobody is commenting you. and some people write anything or single word and they gets comment for anything.
    anyways keep it up..

    ReplyDelete
  2. अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
    वाचकसंख्या गेल्या महिन्यात २५००० च्या आसपास होती,या वरून एक गोष्ट कळली ती म्हणजे लोक वाचत आहेत..पण रिप्लाय द्यायला त्याना वेळ नसावा :-)
    बरेच जण सद्ध्या इथे लिहिलेल्या टिप्स आणि ट्रिक्स वापरत आहेत..कारण माझ्या जावा स्क्रिप्टचा वापर जिथे होतो ते तो ब्लॉग पाहिल्या पाहिल्या मला कळते :-)
    बहुतेक marathiblogs.net वर असलेले ब्लॉगर्स हे एकमेकाना खुप आधी पासून ओळखतात..त्या मुळे ते एकमेकाना प्रतिक्रिया देत असावेत.

    ReplyDelete