५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

तुमचा ब्लॉग Energy Saving Mode मध्ये कसा ठेवाल?

 मित्रांनो आता पर्यंत ब्लॉगिंगचे तंत्रमंत्र मध्ये आपण नवख्या ब्लॉगरने काय काय करणे गरजेचे आहे याची माहिती घेतली.
‘ब्लॉग तयार करताना ज्या मुलभूत गोष्टींची गरज आहे त्यांची आता पर्यंत तुम्हाला माहिती झाली असेल,या पुढे आपण सर्व तुमचा ब्लॉग अधिकाधिक अद्यवत आणि इतरांपेक्षा वेगळा करण्यासाठी काय काय करणे गरजेचे आहे त्याची माहिती करून घेवू या.


मित्रांनो (आणि मैत्रिणीनो..दर वेळी मित्रांनो असे लिहितो त्याचा तुम्हाला राग यायचा) बर्‍याच वेळा आपण एखादा ब्लॉग उघडतो आणि कामाच्या गडबडी मध्ये ते पान संगणकाच्या पडद्यावर तसेच उघडे राहते.त्यामुळे त्याकाळात उर्जेचा वापर तितकाच राहतो.हा वापर काळ्या पडद्याचा वापर करून तितक्या काळासाठी कमी करता येणे शक्य आहे,असे केल्याने काही काळ तुमचा ब्लॉग वापरला गेला नाही तर आपोआप एक काळ्या रंगाचा पडदा तुमच्या ब्लॉग वर उमटतो व त्यामागे काही काळासाठी तुमच्या ब्लॉग वरच्या सर्व गोष्टी झाकल्या जातात.परत जेव्हा तुम्ही त्या ब्लॉग वर माऊस घेवून जाता तेव्हा तुमचा ब्लॉगवरचे साहित्य परत दिसू लागते.यामुळे काही काळासाठी उर्जा वाचते तसेच तुमच्या ब्लॉगला एक आगळे रूप मिळते.
हे कसे कराल?
पाच मिनिटांपेक्षा कमी काळात तुम्ही हे सहज करू शकता.
१)प्रथम ब्लॉगरच्या बदललेल्या नविन स्वरुपानुसार तुमच्या ब्लॉगच्या नावासमोरील घराच्या आकारच्या चिन्हावर टिचकी दिल्यावर जो layout पर्यांय दिसतो त्याच्यावर टिचकी द्या.

२)मग Add a Gadget>>Html/JavaScript पर्यांय निवडा.


३)मग खाली दिलेले कोड ctrl+c कॉपी करून ctrl+v पेस्ट करा.

<script language="javascript" src="http://www.onlineleaf.com/savetheenvironment.js" type="text/javascript">
</script>
४)नंतर सेव्ह करायला विसरू नका.

५)आणि हो आठवणीने एक प्रतिक्रिया लिहायला विसरू नका..कारण बर्‍याचदा माहितीचा वापर तर करतात पण प्रतिक्रिया द्यायला विसरतात.

६)डेमो पाहायचा असेल तर माझा ब्लॉग २ मिनिटासाठी तुमच्या ब्राउजर मध्ये उघडून ठेवा...२ मिनिटात Energy Saving Mode कसा सुरु होतो याचे प्रात्यक्षिक तुम्हाला दिसेल.

धन्यवाद
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर.
 
गुगलप्लसवर शेअर करा

About प्रशांत दा.रेडकर

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

    Blogger Comment
    Facebook Comment

9 comments:

  1. वा वा..खूपच छान.. मी करून पहिले..
    धन्यवाद :)

    ReplyDelete
  2. वा वा..खूपच छान.. मी करून पहिले..
    धन्यवाद प्रशांत :)
    तुम्ही त्याचे प्रात्यक्षिक माझ्या blog वर पाहू शकता.
    http://madhurapaunikar.blogspot.com

    ReplyDelete
  3. मधुराजी तुम्ही माझ्या ब्लॉग वरील ब्लॉगिंगचे तंत्र-मंत्र आवर्जून वापरून त्यावर प्रतिक्रिया देत आहात त्या बद्दल आपले मनापासून धन्यवाद

    ReplyDelete
  4. Prashant,

    Your blog is excellent.Being in IT for over 16 years,I have seen people not doing good power management,keeping monitors,machines switched on even if they go home.I appreciate the time and efforts which you put in writing such nice blog which has great utility value.

    Keep it up!

    ReplyDelete
  5. धन्यवाद,:-) हो बहुतेक वेळा लोक या बाबती मध्ये निष्काळजीपणा दाखवतात.उर्जा वाचवणे खुप गरजेचे असते.

    ReplyDelete
  6. धन्यवाद!फारच चागंली माहिती
    http://www.nashikgreps.com

    ReplyDelete
  7. प्रतीक्रिया दिल्याबद्दल आभारी आहे

    ReplyDelete
  8. tu kharach great aahes yaar...kupach great...

    ReplyDelete
  9. धन्यवाद अनामिक शुभचिंतक :-)

    ReplyDelete